शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

CoronaVIrus In Satara: सायरन वाजताच नागरिकांची होतेय पळताभुई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 15:05 IST

CoronaVirus Police Satara : साधारण सकाळी नऊची वेळ... लोणंद पोलीस ठाण्याच्या पोलीस गाडीचा सायरन वाजताच तरडगाव बसस्थानक येथे गर्दी करून थांबलेल्या नागरिकांनी एकच धूम ठोकली. पोलिसांना सापडू नये म्हणून दिसेल त्या रस्त्याने नागरिक पळताना दिसले.

ठळक मुद्देदुचाकीस्वारांची चौकशी करून समज पोलीस दिसतास नागरिक पळत सुटले

तरडगाव : साधारण सकाळी नऊची वेळ... लोणंद पोलीस ठाण्याच्या पोलीस गाडीचा सायरन वाजताच तरडगाव बसस्थानक येथे गर्दी करून थांबलेल्या नागरिकांनी एकच धूम ठोकली. पोलिसांना सापडू नये म्हणून दिसेल त्या रस्त्याने नागरिक पळताना दिसले.

गावातून फेरफटका मारून गाडी पुन्हा बसस्थानक येथे थांबली असता गावच्या स्वागत कमानीतून ये -जा करणाऱ्या काही दुचाकीस्वारांची चौकशी करीत सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी विनाकारण फिरताना आढल्यास योग्य कारवाई केली जाईल, असे खडसावून सांगितले.राज्यात कोरोनाबाधितांची संख्या थोडीशी कमी होताना दिसत असली तरी विशेषतः ग्रामीण भागात ती वाढून मृत्यूच्या प्रमाणाचा आकडादेखील वाढत आहे. यामुळे अनेक गावे ही प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केली असतानादेखील नागरिक शासन नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.शनिवारी सकाळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, हवालदार अविनाश शिंदे यांनी तरडगाव बसस्थानक परिसरात एन्ट्री करताच गर्दी करून थांबलेल्या नागरिकांची पळताभुई थोडी झाली. वाट दिसेल तिकडे नागरिक सैरावैरा पळाले. काही ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली, तर त्यातील काहींच्या गाडीच्या चाव्या ताब्यात घेतल्या.दुचाकीस्वारांना समज देताना विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तरडगाव प्रवेशद्वार हे ये-जा करणाऱ्यांसाठी बंद करण्यात आले. बंदोबस्तासाठी येथे नेमलेल्या होमगार्डला ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी मदतीसाठी द्या, काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, अशा सूचना विशाल वायकर यांनी दिल्या.नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित...

बंदोबस्तासाठी येथील बसस्थानक येथे होमगार्ड आहेत. मात्र, काही नागरिक त्यांना न जुमानता ये-जा व गर्दी करतात. कित्येकदा गावातील विविध चौकांत अनेक तरुण हे विनाकारण गप्पा मारताना बसलेले दिसतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो. बाधित संख्या आटोक्यात राहण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर