शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : उंब्रजच्या युवकावर कऱ्हाडमध्ये अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:51 IST

कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल उंब्रजचा युवक व कृष्णा रुग्णालयात दाखल साळशिरंबेच्या वृद्धेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यापैकी साळशिरंबेच्या वृद्धेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. उंब्रजच्या युवकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा उंब्रजच्या युवकाच्या मृतदेहावर कऱ्हाडातच अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देउंब्रजच्या युवकावर कऱ्हाडमध्ये अंत्यसंस्कार तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू

कऱ्हाड : कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल उंब्रजचा युवक व कृष्णा रुग्णालयात दाखल साळशिरंबेच्या वृद्धेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यापैकी साळशिरंबेच्या वृद्धेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. उंब्रजच्या युवकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा उंब्रजच्या युवकाच्या मृतदेहावर कऱ्हाडातच अंत्यसंस्कार केले.त्यावेळी संबंधित युवकाचा भाऊ उपस्थित होता. संशयित असूनही संबंधित युवकावर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृताच्या भावाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.

उंब्रजमधील युवकाला सोमवारी दुपारी कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. तसेच साळशिरंबेच्या वृद्धेलाही श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते.

दोघांच्याशी घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सोमवारी रात्री अचानक दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासन हादरले. दोघांचाही श्वसनाच्या तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आरोग्य विभागाने स्पष्ट केले.साळशिरंबेच्या वृद्धेवर तिच्या गावीच अंत्यसंस्कार केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर उंब्रजच्या युवकाच्या मृतदेहावर कऱ्हाडात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर