शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे डोंगराची काळी मैना जाळीतच अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:19 IST

वरकुटे-मलवडी : दुष्काळी माण तालुक्याच्या डोंगरदऱ्यातील मधूर चवीच्या, काळ्यानिळ्या चमकणाऱ्या टपोऱ्या करवंदाची (काळी मैना) ख्याती सर्वांच्याच परिचयाची आहे. सध्या वसंत ऋतूत ...

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे डोंगराची काळी मैना जाळीतच अडकलीविक्री करून पोट भरणाऱ्यावर उपासमारीची वेळ

वरकुटे-मलवडी : दुष्काळी माण तालुक्याच्या डोंगरदऱ्यातील मधूर चवीच्या, काळ्यानिळ्या चमकणाऱ्या टपोऱ्या करवंदाची (काळी मैना) ख्याती सर्वांच्याच परिचयाची आहे. सध्या वसंत ऋतूत घरोघरी विकत घेऊन चवीने खाल्ला जाणारा रानमेवा लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत न येता काटेरी जाळीतच अडकू न पडला आहे.ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ माजवल्याने प्रशासनाने संचारबंदी सुरू केल्याने गावोगावी भरणाऱ्या जत्रा, आठवडा बाजारावर बंदी घातली आहे. त्यामुळे माण तालुक्यातील भोजलिंग डोंगर, विरळी खोरे, वळई, जांभुळणी, चिलारवाडी, पुकळेवाडी, पाचवड, कुकुडवाडच्या डोंगराळ भागातील दऱ्याखोऱ्यात पिकणारी आंबटगोड चवीची करवंद फिरून विकणाऱ्यांचा हक्काचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्या पोटाची खळगी भरणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात बहरणारा रानमेवा स्थानिक नागरिक रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता रानावनात हिंडून, काटेरी जाळीत शिरून गोळा करतात. माण तालुक्यात उन्हाळ्यात देवदेवतांच्या भरणाऱ्या जत्रा, गावोगावच्या आठवडा बाजारात विकतात.

डोंगराळ भागात पिकलेल्या करवंदांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने पाच, दहा रुपयांची किरकोळ विक्री ग्लास, कपाच्या मापाने पळसाच्या मोठ्या पानांवर खायला दिला जातो. तर दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोनेही करवंदाची विक्री केली जाते. मे आणि जून या दोन महिन्यांत घरोघरी जाऊन विक्री करून पोट भरणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मे आणि जून या महिन्यांतच करवंद आणि जांभूळ यासारखी फळे पिकतात. यांच्या मधूर चवीने आणि आयुर्वेदिक गुणांनी भरलेली फळे उन्हाळ्यात खायला लाभदायक असतात. जिभेवर ठेवताच तासन्तास त्याच्या विशिष्ट चवीची आठवण करून देणारा रानमेवा यावर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मिळेनासा झाल्याने आठवणीतच रेंगाळत राहिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर