शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : चिमण्यांसाठी बनवली अनोखी पंधरा घरटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 17:24 IST

पाचगणी : घराघरात फोटोमागे गवत जमा करून गवताच्या घरट्यात किलबिलाट करणाऱ्या चिमण्या दुर्मीळ होऊ लागल्या. याचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊनच्या ...

ठळक मुद्देचिमण्यांसाठी बनवली अनोखी पंधरा घरटी!महूतील युवकांचा स्तुत्य उपक्रम : लॉकडाऊनचा सदुपयोग

पाचगणी : घराघरात फोटोमागे गवत जमा करून गवताच्या घरट्यात किलबिलाट करणाऱ्या चिमण्या दुर्मीळ होऊ लागल्या. याचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊनच्या काळात महू येथील युवकांनी चिमणी वाचावी म्हणून चिमण्यांसाठी पंधरा घरे बनवून त्यामध्ये चारापाण्याची व्यवस्था केली.

चिमण्यांचा रहिवास असणाऱ्या ठिकाणी ती लटकवली आहेत. त्यामुळे चिमण्यांचा किलबिलाट वाढण्यास मदत होणार आहे. या युवकांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.एकविसाव्या शतकाचा उदय झाला आणि आधुनिक तंत्रज्ञानाने जग व्यापल गेलं. परिणामी मोबाईल क्रांती झाली, त्याचा दुष्परिणाम सुरू झाला अन् चिमण्यांचा रहिवासच संपुष्टात येऊ लागला. त्यांच्या अस्ताची सुरुवात झाली, गावाकडे सहज किलबिलाट करणारी चिमणी दिसेनाशी होऊ लागली.गावोगावची जुनी कौलारू घरे पाडून त्यांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. त्यामुळे घरातील भिंतीवरील फोटो फ्रेम, आरसे नाहीसे होऊ लागले आणि चिमण्यांचा आवास संपला. याचे कारण कोणालाच उमगले नाही, ज्यांच्या किलबिलटामुळे माणसे सकाळी लवकर उठायची, ती आता मोबाईलचा गजर लावू लागलीत. त्या कर्णकर्कश गजरच्या आवाजाला वैतागून त्यातपण कृत्रिम पक्ष्यांचे आवाज घालून गजर वाजवू लागले.

सर्वांनी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग राखत घराच्या मागील मोकळ्या जागेत सर्वांनी मिळून ही लाकडी घरटी बनवली. हळूहळू ही घरटी तयार होऊन त्यासोबत अन्न व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली.घरटी बांधायला कोरोनामुळे वेळ...कोरोनाचा प्रकोप झाला, सर्वांना घरात लॉकडाऊन व्हावं लागलं, वाहने जागेवर राहिल्याने प्रदूषण थांबलं आणि चिमण्यांची किलबिल सुरू असल्याशिवाय यांची संख्या वाढणार नाही, हे सर्वांना जाणवत होते; पण ते करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. तो वेळ या कोरोनाने दिला.

महू गावात या चिमण्यांची घरटी बनवायची ही संकल्पना गावातील युवक अविनाश गोळे यांनी मांडली. त्यांना अमोल गोळे, राजेंद्र गोळे, सुजित गोळे, गणेश गोळे आणि जयंत जगताप, प्रशांत गोळे, प्रवीण दिलीप गोळे, गणेश गोळे, शिवाजी गोळे प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य केले. कोणी प्लायवूड, तेलडबे, तार, खिळे उपलब्ध करून दिले.

मुंबई येथे काम करीत असताना कामाच्या परिसरात लावलेल्या घरट्यांनी चिमण्यांचा रहिवास वाढला. हीच संकल्पना मनात रुजली, तीच प्रत्यक्षात गावाकडे साकारली.-अविनाश गोळे, पक्षीमित्र महू, ता. जावळी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर