शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोरोनाचा इंधन विक्रीला फटका, शहरात केवळ दहा टक्के विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:27 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. इंधन विक्रीवर याचा प्रतिकूल परिणाम झाला असून, शहरातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीचा खप तब्बल दहा टक्क्यांवर घसरलेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा इंधन विक्रीला फटका, शहरात केवळ दहा टक्के विक्री तीन लाखांचा खप २० हजार लिटरवर घसरला

सातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. इंधन विक्रीवर याचा प्रतिकूल परिणाम झाला असून, शहरातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीचा खप तब्बल दहा टक्क्यांवर घसरलेला आहे.अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन पुरवठा करण्याचे निर्देश असल्याने पेट्रोल पंपावरील इंधन विक्री दहा टक्क्यांवर घसरली आहे. सातारा शहरात व उपनगरात मिळून १५ पेट्रोल पंप आहेत. या पंपांवरील इंधन विक्री रोज सरासरी तीन लाख लिटर होत असते. सध्या केवळ तीस हजार लिटर इंधन विक्री होत आहे.पेट्रोल पंप चालकांना इंधन विक्रीत झालेल्या घटीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या व्यवसायावर तब्बल तीनशे कुटुंबे अवलंबून आहेत. या कामगारांचा पगार, प्रॉव्हिडंट फंड, एसआयएससी अशा धोरणात्मक बाबी पंप चालकांना सांभाळाव्या लागतात.

याव्यतिरिक्त इंधन खरेदीसाठी तसेच पेट्रोल पंपावर इन्फ्रास्ट्रक्­चर तयार करण्यासाठी पंपचालकांनी बँकांची कर्जे उचललेली आहेत. कर्जाचे व्याज वाढत असल्याने पंप चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. बाहेर कसे पडायचा हा विचार सुरू आहे.शहरातील पेट्रोल पंपावर सुरक्षेसाठी महिला पोलीस मोठ्या प्रमाणावर नेण्यात आले आहेत. हे कर्मचारी परिस्थिती बघून निर्णय घेतात. शहरातील एका पेट्रोल पंपावर दवाखान्यात जाण्यासाठी एक व्यक्ती दुचाकी वाहन घेऊन आली होती.

पंपावरील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला पेट्रोल देता येणार नाही, असे स्पष्ट केले; परंतु दवाखान्यात असल्याने मला माझ्या गाडीत पेट्रोल मिळावे, अशी विनंती त्याने या पोलीस कर्मचाऱ्यांकडे केली, त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पेट्रोल देण्याच्या सूचना केल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना फेब्रुवारी महिन्यापासूनच इंधन खपात मोठी घट झाली. व्यवसाय करत असताना बँकेची कर्ज काढलेले आहेत. त्यांचे व्याज वाढत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेले नाहीत. लॉकडाऊन उठत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे.- रितेश रावखंडे, उपाध्यक्ष, सातारा पेट्रोल डिलर्स असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर