शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोरोनामुळे द्राक्षउत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:26 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे बागा कोरोना संसर्गाचा परिणाम व अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानाचा विपरित परिणाम आशा दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्षे उत्पादित शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीतमजुरांची वानवा, वाहतूक व्यवस्थेचे संकट:ढगाळ हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल

पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे बागा कोरोना संसर्गाचा परिणाम व अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानाचा विपरित परिणाम आशा दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्षे उत्पादित शेतकरी हवालदिल झाला आहे.जगभरासह महाराष्ट्रात प्रत्येक दिवसागणिक कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांची व मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केला आहे. त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाला आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने बाजारपेठेत शांतता झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली तरकारीची पिके सोडून दिली आहेत. त्याचबरोबर अधूनमधून निर्माण होणारे ढगाळ हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल होत आहे. त्याचा जास्तीत जास्त विपरित परिणाम परिसरातील द्र्राक्ष बागांवर होत आहे.

सद्य:स्थितीत द्र्राक्ष बागा माल तोडणीच्या अवस्थेत असल्यातरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची वानवा, वाहतूक व्यवस्थेचे संकट, व्यापारी वर्गाची माल खरेदीची अनास्था व प्रतिकूल वातावरण यामुळे बागेत असलेला माल विकला जाऊन अपेक्षित आर्थिक मिळकत होणार का? याबाबत शेतकरी वर्गामध्ये साशंकता आहे.दरम्यान, वर्षभर प्रचंड भांडवली खर्च व काबाडकष्ट करून पिकविलेला माल कोरोना व पावसामुळे वाया जाणार की काय, या धास्तीने शेतकरी चितांग्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

सर्वच निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे द्र्राक्ष बागांचा उत्पादन खर्च वाढत आहे. सद्य:स्थितीत माल काढणीच्या अवस्थेत असून, कोरोना व प्रतिकूल हवामान याचा विचार करून संबंधित प्रशासनाने द्र्राक्ष उत्पादक शेतकºयांना सहकार्य करण्याची गरज आहे.-राहुल धुमाळ, द्राक्ष उत्पादक शेतकरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर