शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:33 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.

ठळक मुद्देवीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या : शाम राजे कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून कामगार बसून

मायणी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.शाम राजे म्हणाले, ह्यराज्यामध्ये कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय वीटभट्टी आहे. भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असणारे कामगार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून येत असतात. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची कमतरता व मातीच्या अभावामुळे दरवर्षीचा व्यवसाय एप्रिल महिन्यामध्ये अनेक वीट व्यावसायिक वीट थापणी बंद ठेवत असतात.शासनामार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वीट व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून हे वीटभट्टी कामगार बसून आहेत. त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही तसेच यावर्षीचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पाच ते सहा महिने चालणारा हा उद्योग असल्याने हे कामगार दरवर्षी एप्रिल महिन्यांमध्येच आपल्या घरी परतत असतात.यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शासनामार्फत संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदीचे आदेश काढल्यामुळे हे वीटभट्टी कामगार आपापल्या ठिकाणी कामाविना थांबून आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने ऊसतोड कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिली.

शासनाने ऊसतोड कामगारांप्रमाणे या वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालयांमध्ये ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.शासनाने कुंभार समाजाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून गेल्या महिन्यापासून बसून असलेल्या व यावर्षी हंगाम संपूनही वीटकाम थांबलेल्या या वीटभट्टी कामगारांना आपल्या जिल्ह्यामध्ये व राज्यांमध्ये परत जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शाम राजे यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर