शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus InSatara: जिल्ह्यात एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:28 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून, शुक्रवारी एकाच दिवशी एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा बळी गेला.

ठळक मुद्देजिल्ह्यात एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा मृत्यूकोरोनाचा पाचवा बळी; १०९ संशयित नव्याने दाखल

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून, शुक्रवारी एकाच दिवशी एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा बळी गेला. यामध्ये जावळी तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा समावेश आहे. उर्वरित मृत्यू झालेल्या तीन कोरोना संशयितांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समोर येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे पाचजण मृत्यू पावले असून, २०१ रुग्ण कोरोना बाधित आहेत.जावळी तालुक्यातील वरोशी येथील ५८ वर्षीय कोरोना बाधित रुग्णावर कºहाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होते. या रुग्णाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह व श्वसनसंस्थेचा तीव्र आजार झाला होता.

तसेच वरळी मुंबई येथून प्रवास करून आलेली पाचगणी येथील ६४ वर्षीय महिला गृह विलगीकरण कक्षात दाखल होती. या महिलेचाही मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू दम्याच्या आजाराने व हृदविकाराने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कऱ्हाड तालुक्यातील नांदलापूर येथील ६० वर्षीय महिलेचा कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करून आलेल्या दोन महिन्याच्या बालकाला श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून दाखल करण्यात आले होते. या दोन महिन्यांच्या बालकाचाही शुक्रवारी मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या तीन कोरोना संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे स्पष्ट होणार आहे.जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे २२, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ८७ अशा एकूण १०९ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

१४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा ३४, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील ५३, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील ९, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील १५, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील ३५ अशा एकूण १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या २०१ झाली असून, कोरोनामुक्त होऊन १०६ जण घरी गेले आहेत. तर पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ९० कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर