शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात बळींचा आकडा २९, एकाचा मृत्यू तर एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:56 IST

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर एकजण कोरोना बाधित आढळून आला. तसेच महाबळेश्वर येथील कुरोशी या गावात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ६९० वर तर बळींचा आकडा २९ झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात बळींचा आकडा २९, एकाचा मृत्यू तर एक पॉझिटिव्ह विलगीकरण केलेल्या व्यक्तीची आत्महत्या

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर एकजण कोरोना बाधित आढळून आला. तसेच महाबळेश्वर येथील कुरोशी या गावात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ६९० वर तर बळींचा आकडा २९ झाला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी गिघेवाडी, ता. कोरेगाव येथील ७८ वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता. तसेच साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल असणाºया कोल्हापूर येथील ३९ वर्षीय व्यक्तीचा अहवालही कोरोना बाधित आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ६९० वर पोहोचला आहे.दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहितजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असणाऱ्या जावळी तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित २६ वर्षीय महिलेची ३० मे रोजी प्रसूती झाली असून बाळ व आई सुखरुप आहेत. या बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरूवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित २५ वर्षीय महिलेची १० जून रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहित आहे.विलगीकरणातून बाहेर जाऊन आत्महत्यामहाबळेश्वर येथील कुरोशी येथील ५५ वर्षीय व्यक्ती सपत्नीक मुंबईवरून गावी आली होती. या गावात त्यांच्या भावाचे छोटे हॉटेल असून, या ठिकाणी त्यांना विलगीकरणात ठेवले होते. गुरुवारी पहाटे पत्नी झोपेत असतानाच संबंधित व्यक्तीने बाहेर जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह बेल एअर हॉस्पीटलमध्ये नेऊन त्यांच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. दरम्यान, या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे सांगण्यात आले होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर