सातारा : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोनाकाळात गावच्या लोकांसाठी अहोरात्र झटणार्या व स्वतःच्या कुटुंबाची व जिवाची पर्वा न करता कार्यरत राहणार्या गावातील सर्व कोरोनायोद्ध्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना जवळवाडीच्या सरपंच वर्षा विलास जवळ म्हणाल्या, कोरोना योद्धे म्हणजे देवदूतच असून, त्यांचा सन्मान ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. जवळवाडी जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच वर्षा जवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी उपसरपंच शंकरराव जवळ, सदस्य राजेंद्र जवळ, राजेंद्र निकम, सुरेखा मर्ढेकर, शांताबाई जवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर जवळवाडीचे तलाठी शंकरराव सावंत, वायरमन रामा वाघ, ग्रामसेवक वैभव निकम, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक सतीश मर्ढेकर, विशाल रेळेकर, आशा सेविका विद्या जवळ, अंगणवाडी सेविका चंद्रसेना शिंदे, संतोषी देशमुख, उज्ज्वला जवळ, आपले सरकार सेवा केंद्राच्या चालक मीनल हिरवे, अंगणवाडी मदतनीस मीराबाई जवळ, लक्ष्मी ससाणे, पार्वती जवळ, ग्रामपंचायत कर्मचारी बापू हिरवे या सर्वांना "कोरोना योध्दा सन्मान पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला जवळवाडी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, भैरवनाथ तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो आहे...