शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-रोजंदारी कामगारांची व्यथा,अनेकांनी वळविला मुळ गावाकडे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:35 IST

सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.

ठळक मुद्दे हाताला काम नसल्यामुळे दोन वेळचं अन्न मिळणंही झालंय मुश्किलअनेकांनी वळविला मुळगावाकडे मोर्चा

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कोरोनाबाबत साताऱ्यात अद्याप जरी सकारात्मक चित्र असलं तरी पुढील आठ दिवस अजूनही कसोटीचे आहेत. या परिस्थितीत नोकरवर्गाला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय उपलब्ध आहे. पण ज्यांच्याकडे सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागु केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच धार्मिक उत्सवही बंद केल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. परिणामी कोणी काम देता काम असं म्हणत त्यांना दारोदारी फिरायची वेळ आली आहे.

सातारा येथे राजवाडा परिसरात वेठबिगारी कामे करणारे कामगार रोज सकाळी आठच्या सुमारास हजेरी लावतात. कंत्राटदार येथून रोजाची बोलणी करून त्यांना कामाच्या ठिकाणी घेवून जातात. रोजच्या रोज काम करून हातात मिळणाऱ्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण कोरोनाच्या संकटामुळे या सर्वांच्या रोजगाराचे वांदे झाले आहेत.

ग्रामीण भागातून रोजासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे, मात्र, त्यांनी शेतात काम करून अर्थाजनाचा मार्ग शोधला आहे. पण शहरी भागात राहणाऱ्या कामगारांना शेतीच्या कामाचा पर्याय नसल्याने ते समोर येईल ते काम करण्यासाठी रोजंदारीच्या शोधात फिरत आहेत.

काही वेठबिगाऱ्यांनी हॉटेलात तर कोणी स्वच्छतेचे काम स्विकारून आपला एकएक दिवसाचा रोजगार मिळविला. भविष्यात मात्र, हे स्थिती अधिक गंभीर होईल, हे निश्चित!

जीवनावश्यक वस्तुंसाठी आप्तकालीन कक्षाची गरजजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारकरांना गर्दी करण्याचे टाळा असे आवाहन केले आहे. परिणामी अनेक सातारकरांनी घरात राहणंच पसंत केलं आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि व्यापार परिणाम झाला आहे.

नोकरदार सुट्टी काढून तर व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू ठेवून उदरनिर्वाह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे वांदे झाले आहेत. शासन स्तरावर अशा लोकांची माहिती संकलित करून त्यांनाही जिवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देण्यासाठी आप्तकालीन कक्षाची उभारणी करणं आवश्यक बनलं आहे.राजवाडा चौपाटीचाही अनेकांना फटकाराजवाडा चौपाटी हे खाद्याचं ठिकाण अनेकांच्या आवडीचं आहे. कित्येकांची क्षुधाशांती करणारे हे ठिकाण तब्बल अडीचशेहून अधिक कुटूंबांना आधार देतं. यातील बहुतांश लोक रोजच्या रोज मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालवतात. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ३१ मार्चपर्यंत चौपाटी बंद ठेवण्यात आली आहे. याचाही मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. यातील बाहेरगावचे व्यापारी इथं राहून खर्च करण्यापेक्षा आपापल्या गावी परतले आहेत.

चौपाटी बंद झाल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. काही कारणांनी पूर्वी चौपाटी बंद असली तरीही घरगुती कार्यक्रमांच्या आॅर्डर मिळवून विक्रेते त्यांच्या झालेला खडा भरून काढायचे. आता मात्र सर्वावरच बंधने आल्याने इथं राहून खर्च वाढविण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने कामगार गावी गेले आहेत.- देवेंद्र शर्मा,चौपाटी व्यावसायिक, सातारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर