शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

corona virus -साताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या दोनवर, एक महिला बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:51 IST

सातारा जिल्ह्यातील ४५ वर्षीय एक महिला कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कलिफोर्नियातून आलेल्या एका पुरुषाचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोनवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या दोनवर, एक महिला बाधित आता कॅलिफोर्नियातून आलेल्या पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

सातारा : सातारा जिल्ह्यातील ४५ वर्षीय एक महिला कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कलिफोर्नियातून आलेल्या एका पुरुषाचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोनवर पोहोचली आहे.जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीन, इटली, अमेरिका अशा देशात तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा आहे. आता भारतातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागलीय. सातारा जिल्ह्यातही सोमवारी प्रथमच एक महिला कोरोना बाधित आढळून आली.

संबंधित ४५ वर्षीय महिला रविवारी सायंकाळी जिल्ह्यात आली होती. त्यानंतर त्या महिलेला रात्रीच्या सुमारास अचानक खोकला येऊ लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले.

त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. याचा अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये संबंधित महिला कोविड - १९ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. असे असतानाच सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक पुरुष कोरोना बाधित झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका ६३ वर्षीय पुरुषाला ताप व घसा दुखी असल्यामुळे शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने दाखल करण्यात आले होते. या संशयित रुग्णाचा रिपोर्ट मिळाला असून तो कोविड - १९ बाधित आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर