शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:49 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यूजिहेत सर्वाधिक १९ पॉझिटिव्ह; बळींचा आकडा ५३

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.जिल्ह्यातील खटाव आणि वाई तालुक्यात रविवारी दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खटाव तालुक्यातील पडळमधील ५५ वर्षीय पुरुष तर वाई तालुक्यातील ब्राम्हणशाहीतील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आठ तालुक्यातील ५६ जणांचा अहवाल शुक्रवारी रात्री बाधित आला. त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील लाखवडमधील २८ वर्षीय महिला आणि कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज येथील २३ वर्षीय युवक, मुंढेतील ४१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तसेच फलटण तालुक्यात १३ जण कोरोना बाधित आढळून आले. अलगुडेवाडीतील १४ वर्षीय मुलगी, रविवार पेठेतील ७, १२ आणि १६ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय पुरुष, ६८, ४२, वर्षीय पुरुष ३२ आणि २० वर्षीय युवक, १४ वर्षीय दोन मुली, २५ वर्षीय महिला, मलठणमधील ३९ वर्षीय महिलाचा समावेश आहे.

खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील २४ वर्षीय युवक, न्यू कॉलनीतील ३० आणि २३ वर्षीय युवक, देशमुख आळीतील ३५ आणि ४५ वर्षीय महिला, लोणंद मधील मऱ्याचीवाडीतील ३४ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

त्याचबरोबर सातारा तालुक्यातील जिहे येथेही रुग्ण संख्या वाढत असून, सर्वाधिक १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ४९ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय पुरुष, २० वर्षीय युवक, ८ वर्षीय मुलगा, ६८ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष तसेच ८१ आणि ६२ वर्षीय पुरुष तसेच ४२ आणि ५७ वर्षीय महिला, ४ वर्षाची मुलगी, ३० वर्षाची महिला, १९ वर्षीय युवती, ३ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगी, ३२ वर्षीय महिला आणि ७० व ५५ वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोडमधील २० वर्षीय युवक, धावलीतील १७ वर्षीय मुलगा आणि पानमळेवाळीतील ४३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.पाटण तालुक्यातही ९ कोरोना बाधित आढळून आले. मलवडीतील २४ वर्षीय युवक, मोरगीरीतील ३३ वर्षीय पुरुष, कासरूंडमधील ३५ वर्षीय पुरुष, चोपडीतील १६ वर्षीय मुलगी तसेच २४ वर्षीय युवती, बेलवडेतील ३६ वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडीमधील २८ वर्षीय युवक, गोकूळ येथील १८ वर्षीय युवक, मारुलमधील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वाई तालुक्यातील धर्मपूरीमधील ४६ वर्षीय पुरुषासह माण तालुक्यातील कुळकजाईतील २५ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर