शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:33 IST

सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देसातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन दोन आठवडे राहणार कामकाज बंद

सातारा : सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून अहोरात्र झटत आहेत. स्वच्छता, औषधफवारणी, धूर फवारणी, घर टू घर सर्व्हे, प्रतिबंधित क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना, कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार अशी अनेक कामे हे कर्मचारी जबाबदारीने पार पाडत आहे. हे करत असतानाच काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागनही होत आहे.

काही दिवसांपूर्वीच कोरोना व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली होती. त्यापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.या विभागातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी क्वारंटाईन आहेत. संपूर्ण विभागच क्वारंटाईन झाल्याने या विभागाचे कामकाज दोन आठवडे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, कोरोनामुळे सलग पाच दिवस बंद असलेल्या पाणीपुरवठा विभागाचे कामकाजही गुरुवारी अंशत: सुरू झाले.नागरिकांची परवडशहरातील रुग्णालये, प्रसुतीगृहात जन्माला आलेल्या शिशूंची नोंद करून ती पालिकेकडे दिली जाते. तसचे स्मशानभूमीत मृत्यू झालेल्यांनी नोंदही पालिका करते. संगणक प्रणालीद्वारे नागरिकांना जन्म-मृत्यूचे दररोज शंभर तर महिन्याला सुमारे अडीच हजार दाखले दिले जातात.

हा विभाग पूर्णत: बंद असून, तसा सूचना फलक विभागाबाहेर लावण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने गुरूवारी दाखल्यांसाठी पालिकेत आलेल्या नागरिकांना सूचना फलक वाचून माघारी जावे लागले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका