शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
3
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
4
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
5
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
6
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
7
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
8
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
9
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
10
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
11
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
12
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
13
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
14
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
15
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
16
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
17
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
18
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
19
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
20
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:39 IST

सातारा:जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर नवे ८०० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या २२ हजार १४७ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ५८२ झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यूबळींची संख्या ५८२ वर, ८९३ कोरोना मुक्त

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर नवे ८०० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या २२ हजार १४७ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ५८२ झाला आहे.जिल्हात बुधवारी रात्री ८१७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यात १८०, सातारा-१८७, पाटण-३६, वाई- ८३, खंडाळा-५४, खटाव-५२, माण- १७, कोरेगाव-९१, जावळी-३८, महाबळेश्वर-१४, फलटण-५२ जणांचा समावेश आहे.

त्याचबरोबर २५ जणांचा मृत्यू झालेल्यांमध्ये साताऱ्यातील कामाठीपुरा येथील ४३ वर्षीय महिला, कुसवडे सातारा येथील ४४ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ६० वर्षीय महिला, शाहुनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील ५५ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील ८३ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

चीचणी येथील ४२ वर्षीय महिला, अंबेरी कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, चाळकेवाडी सातारा येथील ४८ वर्षीय महिला, वडूज खटाव येथील ७० वर्षीय महिला, राऊतवाडी कोरेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील ८५ वर्षीय पुरुष, कोल्हापूर नाका कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, कुंभारगाव पाटण येथील ७५ वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील ६२ वर्षीय पुरुष, कोळेश्वर कराड येथील ७८ वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील २८ वर्षीय पुरुष, कार्वे नाका कराड येथील ६७ वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील ८२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील ५८ वर्षीय पुरुष, औंध येथील ४५ वर्षीय पुरुष, वाजेगाव खानापूर येथील ३९ वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील ३० वर्षीय पुरुष, कराड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.१३ हजार कोरोनामुक्तजिल्ह्यात गुरूवारी एका दिवसात तब्बल ८९३ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळतोय. तसेच आत्तापर्यंत १३ हजार ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर