शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-साताऱ्यात कोरोनाचे पाच संशयित; विलगीकरण कक्षात केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 14:05 IST

कोरोनाची संशयितांची संख्या आता वाढत असून, एका दिवसात साताऱ्यात पाच कोरोनाचे संशयित दाखल झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात कोरोनाचे पाच संशयितविलगीकरण कक्षात केले दाखल

सातारा : कोरोनाची संशयितांची संख्या आता वाढत असून, एका दिवसात साताऱ्यात पाच कोरोनाचे संशयित दाखल झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेल्या २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा २४ वर्षीय मित्रालाही सर्दी व खोकला असल्याने त्यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अकरा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेल्या २४ वर्षीय युवकाचा घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री एक वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले.दरम्यान, शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व रात्री दहा वाजता दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना संशितांची संख्या आता पाच झाली आहे. पाचही रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर