शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in satara-कोरोनाच्या धास्तीेने सिव्हिलमधील रुग्ण गेले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 16:10 IST

कोरोनाच्या धास्तीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी गेले आहेत. पूर्वी वॉर्डमध्ये रुग्णांना कॉट उपलब्ध नसायच्या पण आता बहुतांश वॉर्ड मोकळे पडले आहेत. काही वॉर्डामध्ये एकही रुग्ण नाही.

ठळक मुद्देकोरोनाच्या धास्तीेने सिव्हिलमधील रुग्ण गेले घरीकर्मचारी चिंताग्रस्त : नेहमीच्या उपचारासाठीही संख्या रोडावली

सातारा : कोरोनाच्या धास्तीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी गेले आहेत. पूर्वी वॉर्डमध्ये रुग्णांना कॉट उपलब्ध नसायच्या पण आता बहुतांश वॉर्ड मोकळे पडले आहेत. काही वॉर्डामध्ये एकही रुग्ण नाही.साताऱ्यात कोरोनाचे दोन बाधित रुग्ण सापडल्यानंतर सिव्हिलमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सिव्हिलमध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे बाधित आणि संशयित ठेवले आहेत. त्या परिसरातील वॉर्ड अक्षरक्ष: रिकामे झाले आहेत. वॉर्डमधील रुग्णांनी स्वत:हून डिर्स्चाज घेतला आहे.

इथं संसर्ग होण्यापेक्षा घरी राहून आम्ही उपचार घेतो, असे सांगून अनेकांनी घरी राहणे पसंत केले आहे. इतर दिवशी सिव्हिलमध्ये रोज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक असायची. मात्र, आता दिवसाला केवळ ६० रुग्ण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नेहमी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही अत्यंत कमी झाली आहे. कोरोनाची दहशत नागरिकांच्या मनामध्ये असल्यामुळे सिव्हिलमध्ये उपचार घेण्यासही कोणी येत नाही. ज्या लोकांना नाईलाज आहे, असे लोक या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत आहेत.

या रुग्णांपासून तर आम्हाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही ना, अशी चिंता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही लागून राहिली आहे.

शहरातील खासगी दवाखानेही अद्याप बंद आहेत. असे असताना सिव्हिलमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाल्याने खासगी दवाखान्यातील लोक नेमके कुठे उपचार घेत आहेत, असा प्रश्न सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

गत आठवड्यात जोपर्यंत कोरोनाचा बाधित रुग्ण सापडत नव्हता. तोपर्यंत सिव्हिलमध्ये रुग्णांची ये-जा सुरू होती. परंतु आता ही परिस्थिती राहिली नाही.सिव्हिलला वळसा...सिव्हिल परिसरात जाण्यासाठी अनेकजण धजावत नाहीत. सिव्हिलला वळसा घालून अनेकजण जात आहेत. मात्र, सिव्हिलच्या रस्त्याने कोणी जात नाही. जेणेकरून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून याची खबरदारी त्यांनी घेतली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर