शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे घरातच घ्यावे लागणार उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 10:39 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आता मोठ्या शहरांप्रमाणे तीव्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार करावे लागतील अशी स्थिती आहे. याबाबत जिल्हा प्रशासन पातळीवरही विचार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुरुवात लवकरच होऊ शकते.

ठळक मुद्देकोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे घरातच घ्यावे लागणार उपचार! प्रशासन पातळीवर विचार : होम आयसोलेशनला लवकरच होऊ शकते सुरुवात

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आता मोठ्या शहरांप्रमाणे तीव्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार करावे लागतील अशी स्थिती आहे. याबाबत जिल्हा प्रशासन पातळीवरही विचार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुरुवात लवकरच होऊ शकते.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित होती. त्यातच कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव आटोक्यात येईल, असे वाटत होते. पण, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली.

त्यामुळे आता जुलै महिना संपत असताना रुग्णसंख्या ३ हजार २०० च्यावर गेली. तर या कोरोनामुळे ११३ जणांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तेवढी यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता यावर होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आला आहे.कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने मुंबई, पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी होम आयसोलेशनची सुरूवात झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही याची सुरुवात करण्याबाबत जिल्हा प्रशासन स्तरावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना विषाणूची कमी तीव्रता असणाऱ्या रुग्णांसाठी हा पर्याय वापरण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्णाच्या घरात होम आयसोलेशनची सोय होऊ शकते का ?. घरात कोणी काळजी घेऊ शकतो का ? याचा विचार यामध्ये होणार आहे.त्याचबरोबर एखाद्या रुग्णावर घरात उपचार सुरू असताना काही अडचण आली तर डॉक्टरांचे संपर्क क्रमांकही देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या यापुढेही मोठ्या प्रमाणात वाढत चालली तर जिल्ह्यात होम आयसोलेशनला लवकरच सुरुवात होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.साडे तीन हजारांवर बेड क्षमता...जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये काही कोरोना केअर सेंटर तसेच रुग्णालयातही हे उपचार सुरू आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात साडे तीन हजारांवर बेड क्षमता उपलब्ध आहे. येथे संशयित तसेच रुग्णांना ठेवता येते. यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत ३३ कोरोना केअर सेंटर आहेत.

याठिकाणी २ हजार ९०० बेड उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा रुग्णालया अंतर्गत डीसीएससी व डीसीएचआय प्रत्येकी सहा असून येथे ७५० हून अधिक बेड उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले.पाच दिवसांत ५६३ रुग्ण...जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून गेल्या पाच दिवसांत नवे ५६३ रुग्ण आढळून आले आहेत. तर या पाच दिवसांत २६ जणांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर वाढत असताना प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरही ताण येणार आहे. याचा विचार करुनच होम आयसोलेशनचा पर्याय पुढे येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर