शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

corona virus -कोरोनावर दैवी उपचार सांगणाऱ्या भोंदूगिरीपासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 14:33 IST

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे बाबा कोरोनावर दैवी उपचार सांगतील, अशांपासून सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरोनावर दैवी उपचार सांगणाऱ्या भोंदूगिरीपासून सावध राहामहाराष्ट्र अंनिसचे आवाहन ; शासनाच्या सूचनांचे पालक करा

सातारा : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे बाबा कोरोनावर दैवी उपचार सांगतील, अशांपासून सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी केले आहे.कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी लवकर व स्वस्तात उपाय कुठून ,कसा मिळेल ,असं लोकांना वाटणं,यात लोकाची काही चूक नाही. मात्र,लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा तसेच भावनांचा स्वत:च्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक उपयोग करून घेणारी काही मंडळी प्रत्येक समाजात कार्यरत असतात. सद्याच्या परिस्थीतीत या जीवघेण्या विषाणूबाबत समाजमनात एक अदृश्य, अनामिक भीती निर्माण होणे साहजिक आहे.

देव-धर्म, अध्यात्म यांच्या नावाखाली,कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्र-मंत्र ,जपजाप्य, धार्मिक प्रार्थना,पूजापाठ, होम-हवन, पठण अशा विविध अवैज्ञानिक,दैवी उपायांचे खात्रीशीर दावे, छातीठोकपणे करुन लोकांच्या गळी उतरविण्यात, ही ढोंगी मंडळी यशस्वी होताना दिसतात.

आपण सर्वजण या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आहोत. तो तसाच पुढे देत राहू, वाढवत राहू या.  अशा परिस्थीतीत ,लोकांच्या मनातील या भयग्रस्ततेचा गैरफायदा घेऊन, दैवी,अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवण्यास पूरक ठरणारे उपाय ,उपचार करणारी काही भोंदूबुवा ,मांत्रिक ,गुरु ,भगत, पाद्री ,मौला- मौलवी अशी मंडळी पुढील काळात मोठ्या प्रमाणात समाजात उदयास येण्याची शक्यता आहे.

एक सजग नागरिक ,विवेकी कार्यकर्ता म्हणून आपण अशा ढोंगी,भोंदूबुवा यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून असायला हवे. शोषणाचे असे प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,किंवा तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन यांना शक्यतो सबळ पुराव्यानिशी आपण तत्काळ कळवायला हवे. त्याचप्रमाणे घरात थांबून आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांनाही कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेसह त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी धैर्य देणे आवश्यक आहे.

दैवी उपचार सांगणाऱ्या तशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या समाजातील भोंदूगिरीविरोधात सतत प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनीही स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी स्वत: घ्यावी. भोंदूगिरीपासून सावध राहावे,त्यांच्या मागे लागू नये. शासन,प्रशासन यांच्या आदेशांचे,सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर