शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - गर्दी टाळा अन्यथा कठोर कारवाई करणार- जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:08 IST

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी केल्यास व अनावश्यक घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे गर्दी टाळा अन्यथा कठोर कारवाई करणार- जिल्हाधिकारी वनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये अथवा साठेबाजी करू नये

सांगली : जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच अशा वस्तुंच्या आस्थापनांना वेळेचे कोणतेही बंधन घातलेले नाही. त्यामुळे लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी कोठेही गर्दी करू नये अथवा साठेबाजी करू नये, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी केल्यास व अनावश्यक घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी व सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू याबाबत प्रशासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.

स्वत:बरोबरच स्वत:च्या कुटुंबाचीही काळजी घ्या. सद्याचा काळ अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे स्वत:चा व कुटुंबांचा जीव धोक्यात न घालता गर्दीच्या ठिकाणी जाणे, घराबाहेर जाणे टाळा. अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री करणाऱ्या आस्थापनांनी गर्दी टाळून सुरक्षित अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. तसेच जिल्ह्यात दि. 23 मार्च पासून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.चुकीचे, गैरसमज निर्माण करणारे, फेक मेसेज सोशल मीडियातून फॉरवर्ड केले जात आहेत. त्यांच्यावर सायबर सेल मार्फत कारवाई करण्यात येत असून लोकांनी असे संदेश पाठवू नयेत. याबाबत ग्रुप ॲडमिननी सर्वोतोपरी दक्षता घ्यावी. अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.जिल्ह्यांतर्गत, जिल्ह्याच्या सीमांवर चेक पोस्ट लावण्यात आले असून जिल्ह्यात येणारे अनावश्यक लोक जिल्ह्यात येत असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच शहरांतर्गत वाहतूक नियंत्रणासाठीही चेक नाके स्थापन करण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले लोक फिरत असताना आढळल्यास सक्तीने इंस्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये पाठविण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.अशा पध्दतीने आतापर्यंत फिरताना दोन व्यक्ती आढळल्या असून त्यांना इंस्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये पाठविण्यात आले आहे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया ही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज येथे कोरोना चाचणीसाठीची लॅब आठवडा अखेर पर्यंत उभी रहात असून आवश्यक साधन सामग्री उपलब्ध होत असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तजवीज करण्यात आलेली आहे. या लॅबमुळे मोठा फायदा होणार असून तपासणीनंतर सात ते आठ तासात तपासणीचा अहवाल उपलब्ध होणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली