शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:15 IST

प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मिरज यांनी दिली.

ठळक मुद्देपाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाईपालकत्व पत्करलेल्या लोकांनी घाबरून पाळीव प्राणी सोडून देवू नये

सांगली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पाळीव प्राण्यांना मोकळे सोडून दिल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. असे पाळीव प्राण्यांच्या पालकाने केल्यास हे कृत्य प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे समजले जाऊन प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मिरज यांनी दिली.

पाळीव प्राणी जसे कुत्रा, मांजर, कोंबड्या इत्यादीच्या मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावतो हा गैरसमज असून या प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. त्यामुळे या प्राण्यांचे पालकत्व पत्करलेल्या लोकांनी घाबरून आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देवू नये. त्यामुळे प्राण्यांची उपासमार होऊ शकते.उपासमारीमुळे अथवा आजारामुळे, अपघातामुळे त्यांना अपंगत्व अथवा मृत्यूस करणीभूत ठरणार नाही, याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी. याबाबत अफवा पसरणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. असे झाल्यास प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली