शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Satara updeates : लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 11:28 IST

CoronaVirus Satara updeates : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण अजूनही कोरोनाची चाचणी करीत नसल्याचे समोर येत आहे. लक्षणे असूनदेखील कोरोना चाचणी न करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी लक्षणे अंगावर न काढता तत्काळ चाचणी करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी : जिल्हाधिकारीगाईडलाईननुसार आयुर्वेदिक उपचार पद्धती

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण अजूनही कोरोनाची चाचणी करीत नसल्याचे समोर येत आहे. लक्षणे असूनदेखील कोरोना चाचणी न करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी लक्षणे अंगावर न काढता तत्काळ चाचणी करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात १०९१ इतके कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. मागच्या वर्षीचा उच्चांक १११७ उच्चांक १५ सप्टेंबरला होता. आपण त्याचे जवळपास पोहोचतो आहोत. कोरोनाशी लढा देण्यासाठी कोरोनाचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण लवकरात लवकर रुग्णाला तपासून त्याची चाचणी करून घेतली आणि उपचार लवकर सुरू झाले तर पेशंटला वाचवून घेण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो.

अनेकदा पेशंट असूनसुद्धा अंगावर काढत आहेत. लवकर निदान करून घेतले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. खोकला आहे, घसा दुखतोय, ताप आहे किंवा वास येत येत नाही तर जवळच्या डॉक्टरना दाखवा. काही लोकांना डायरियाचा प्रॉब्लेम असायचा आणि त्यानंतर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत होती. तुमच्या फॅमिली डॉक्टरना दाखवून तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला कोरोना चाचणीची गरज आहे किंवा नाही. चाचणी न करता घरामध्ये बसून राहू नका. थकवा जाणवत असेल तरी घरात बसून राहू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार आयुर्वेदिक उपचार पद्धतीसुद्धा लोक घरच्या घरी घेऊ शकतात. काढा, पाणी हळदी आणि मीठ टाकून गुळण्या करा. आपल्या घरामध्ये पूर्वीपासून ज्या पारंपरिक उपचार पद्धती केल्या जात होत्या, त्यांचा आधारदेखील लोकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर