शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara : मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 14:00 IST

कऱ्हाड तालुक्यातील दोन जणांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला होता. त्यातील ७० वर्षीय महिला रुग्णाचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.

ठळक मुद्दे मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह३ नागरिक विलगीकरण कक्षात दाखल, एका रुग्णावर आणखी ५ दिवस उपचार

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील दोन जणांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला होता. त्यातील ७० वर्षीय महिला रुग्णाचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.

त्यामुळे तिचा मृत्यू श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे झाला असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. तर इतर ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. ३ नागरिक नव्याने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून विलगीकरण कक्षातील एका रुग्णाव आणखी ५ दिवस उपचार करण्यात येणार आहेत.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे १२, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील २२, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड व फलटण येथील प्रत्येकी १ असे एकूण 36 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथे काल मृत्यु झालेल्या 70 वर्षीय महिलेचा नमुनाही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.काल सोमवारी दि. २० एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ३ नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसगार्मुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

येथे दाखल असणाऱ्या बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचा एक अहवाल पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल कोणताही निष्कर्ष काढता येत नसल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस उपचार व पुनर्तपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर