शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara : लढवय्या मुलीला खाकी म्हणाली, हॅप्पी बड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:22 IST

लोणंदमधील एका चिमुकलीला तिच्या वाढदिवसादिवशीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पोलिसांनी चिमुरडीला शब्द दिला होता की, बाळा, दवाखान्यातून बरी होऊन आल्यावर केक कापून दणक्यात वाढदिवस साजरा करू, अन् तो शब्द पोलिसांनी पाळला.

ठळक मुद्दे लढवय्या मुलीला खाकी म्हणाली, हॅप्पी बड्डेउपचार करून आल्यावर लोणंदमधील चिमुरडीचा वाढदिवस साजरा

लोणंद : लोणंदमधील एका चिमुकलीला तिच्या वाढदिवसादिवशीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यावे लागणार होते. वाढदिवसादिवशीच ही वेळ आल्याने कुटुंबीय हतबल झाले होते; पण पोलिसांनी चिमुरडीला शब्द दिला होता की, बाळा, दवाखान्यातून बरी होऊन आल्यावर केक कापून दणक्यात वाढदिवस साजरा करू, अन् तो शब्द पोलिसांनी पाळला.याबाबत माहिती अशी की, लोणंद येथील एका मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आली. योगायोगाने त्याच दिवशी तिचा वाढदिवसही होता. वय किती? असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला तेव्हा, तिला आजच १३ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच वाढदिवस असल्याचे घरातील लोकांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित सर्वजण काहीवेळ नि:शब्द झाले.

वाढदिवसाच्या दिवशीच तिला १४ दिवसांसाठी या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आई-वडिलांना सोडून सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती व्हावे लागणार होते. त्याचवेळी लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी त्या मुलीला शब्द दिला की,  तू घरी परत आल्यावर तुझा वाढदिवस केक कापून दणक्यात साजरा करू.या चिमुरडीने जिल्हा रुग्णालयात झुंज देऊन गुरुवारी कोरोनावर मात केली. गुरुवारी ती रुग्णालयातून बरी होऊन हसतमुखाने आपल्या लोणंद येथील घरी परतली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी त्या मुलीला जाताना दिलेला शब्द पाळला.

चौधरी व खंडाळ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, रोहित निंबाळकर, पोलीस हवालदार फैय्याज शेख, अविनाश शिंदे आदींनी तिच्या घरी जाऊन तिचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा केला. त्यावेळी तिचे आई-वडील, लहान भाऊ, बहीण व नातेवाईक उपस्थित होते.फुलांची उधळणसातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन चिमुरडी घरी गेली, तेव्हा औक्षण करून तिचे कुटुंबीयांनी घरात स्वागत केले. तर शेजारचे मंडळी, इतर नागरिकांनी फुलांची उधळण करत तिचे कौतुक केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर