शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara : सिव्हिलमधील आठ रुग्ण कोरोनामुक्त; १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 13:54 IST

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आठ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

ठळक मुद्देसिव्हिलमधील आठ रुग्ण कोरोनामुक्त; १२९ जणांचे अहवाल निगेटिव्हप्रशासनाला दिलासा ; नव्याने ७० संशयित दाखल

सातारा : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आठ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.आत्तापर्यंत जिल्ह्यातून १०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही आंनदाची बातमी आहे. दरम्यान, आणखी ७० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या आठ कोरोनामुक्त रुग्णांना गुरुवारी सकाळी आपापल्या घरी सोडण्यात आले. फलटण तालुक्यातील तरडगाव येथील ६७ वर्षीय महिला, ६ वर्षाचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील १३ वर्षांची मुलगी, कोडोली ता. सातारा येथील १८ वर्षांचा युवक, महाबळेश्वर येथील २३ वर्षीय पुरुष, त्रिपूटी ता. कोरेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा १८ वर्षीय युवक अशा एकूण आठजणांचा त्यामध्ये समावेश आहे.जिल्हा शासकीय रुग्णालय ३४, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील ५५, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील ११, ग्रामीण रुग्णालय, वाई ७ व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील १२, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील १० अशा एकूण १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

७० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात १३, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ५७ अशा एकूण ७० रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १८१ झाली असून त्यामध्ये १०६ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेल आहेत. चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ७१ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.या गावात नव्याने ११ जण पॉझिटिव्हसातारा तालुक्यातील चिंचनेर लिंब येथील मुंबई वरून आलेला ३० वर्षीय युवक, गादेवाडी ता. खटाव येथील ३० व ३२ वर्षीय युवक, तसेच या नातेवाईकाच्या निकट सहवासातील 9 वर्षाची मुलगी, म्हासोली, ता. कऱ्हाड येथील २२ वर्षीय युवती व २८ वर्षीय युवक तसेच मेरुएवाडी येथील ३३ वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील ५० वर्षीय पुरुष, कवठे, ता. खंडाळा येथील ३३ वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कऱ्हाड  येथील ५० वर्षीय निकट सहवासित अशा एकूण ११ जणांचे अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर