शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara : जिल्ह्यात पती-पत्नीसह ८ जण कोरोनाबाधित : एकूण १४६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:07 IST

सातारा : जिल्ह्यातील आणखी ८ जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी सकाळी स्पष्ट झाले. यापैकी मायणी येथील दोघे जण पती-पत्नी आहेत. ...

ठळक मुद्देजिल्ह्यात पती-पत्नीसह ८ जण कोरोनाबाधित : एकूण १४६ रुग्ण १0 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ३२ जणांना केले दाखल

सातारा : जिल्ह्यातील आणखी ८ जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी सकाळी स्पष्ट झाले. यापैकी मायणी येथील दोघे जण पती-पत्नी आहेत. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूर्ण संख्या १४६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली

मुंबईवरुन प्रवास करुन आलेला लोणंद (ता. खंडाळा) येथील युवक (वय ३३) व अकोला येथून प्रवास करुन आलेले मायणी (ता. खटाव) येथील दाम्पत्य (वय अनुक्रमे ५५ व ४८) कोरोनाबाधित आढळून आले.

या तिघांवर येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. मायणी येथील दाम्पत्यासोबतच त्यांच्या मुलाच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत त्याचा अहवाल आला नव्हता. म्हासोली (ता. कºहाड) गावातील कोविड बाधित रुग्णाच्या निकट सहवासित दोन पुरुष (वय अनुक्रमे ४५ व ६२) आणि तीन महिला (वय अनुक्रमे ४८, ३५ व ६0 ) या पाच जणांवर कºहाड येथील कृष्णा हॉस्टिपलमध्ये उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- १४६ झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या ७१ इतकी असून कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले रुग्णसंख्या ७३ आहे तर २ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल आहेत.

कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील १0 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवार, दि.१८ मे रोजी रात्री उशीरा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ३२ जणांना दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.उपचार सुरु असतानाच महिला पसार...मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली ५८ वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ही महिला मुंबई येथे वास्तव्यास असतानाच ती कोरोनाबाधित झाली होती. मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु असतानाच ती आपल्या मुलासह तिथून पसार होऊन खंडाळ्यात दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे.

संबंधित महिला व तिचा मुलगा रीतसर परवानगी घेऊन सातारा जिल्ह्यात दाखल झाले होते का? याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. संबंधित महिलेवर मुंबई येथे उपचार झाल्याने या महिलेची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणना केली गेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर