शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara-जिल्ह्यात एकाच दिवसात १२१ कोरोना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:32 IST

जिल्ह्यात कोरोना संशयितांचा आकडा वाढत असून, शुक्रवारी एका दिवसांत १२१ जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तीन नागरिकांचे अहवाल अनिर्णित आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देजिल्ह्यात एकाच दिवसात १२१ कोरोना संशयित३१ जाणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; तीन नागरिकांचे अहवाल अनिर्णित

सातारा : जिल्ह्यात कोरोना संशयितांचा आकडा वाढत असून, शुक्रवारी एका दिवसांत १२१ जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तीन नागरिकांचे अहवाल अनिर्णित आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी ३३, कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे २४, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ३०, फलटण येथे २ व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे ३२, असे एकूण १२१ जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सिव्हिलमध्ये दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २२, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील ४ व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील १ असे एकूण ३१ जाणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून सातारा येथील २  व कऱ्हाड येथील १ असे एकूण ३ नागरिकांचे अहवाल अनिर्णित आहेत.जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा २१ वर असून, एकट्या कऱ्हाडमध्ये ११ कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे कऱ्हाड हा सध्या हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर