शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Satara : बाहेर फिरणाऱ्या ६० जणांची कोरोना चाचणी; १ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:11 IST

corona cases in Satara : सातारा जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना बॉंबे रेस्टोरंन्ट चौकात थांबवून शहर पोलिसांनी घेतलेल्या कोरोना चाचणीत ६० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर १ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.

ठळक मुद्देबाहेर फिरणाऱ्या ६० जणांची कोरोना चाचणी; १ जण पॉझिटिव्ह वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांनी सोडली दुचाकीतील हवा

सातारा : जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना बॉंबे रेस्टोरंन्ट चौकात थांबवून शहर पोलिसांनी घेतलेल्या कोरोना चाचणीत ६० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर १ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.जिल्हयात कोरोना बाधित आकडा कमी आला असला तरी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने अनलॉकमध्ये निर्बंध कडक आहेत. सोमवार ते शुक्रवार ९ ते २ आणि शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात दूध, मेडिकल, खते, बी-बियाणे या दुकानांव्यतिरित इतर दुकाने बंद आहेत. मात्र, या-ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत आहेत.

शहर पोलिसांनी बॉंबे रेस्टोरंन्ट चौकात शनिवारी सकाळी कारवाई करत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना (अँटिजेन) टेस्ट घेण्याची धडक मोहीम राबवली. याकामी गोडोलीच्या ग्रामीण आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली. कोविड चाचणीचा धडाका सुरु करण्यात आला.

पुढे चाचणी सुरु असल्याने अनेकांनी त्याठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले. चार जणांच्या कोरणा चाचणी केल्यानंतर त्यामध्ये एक जण कोरणा बाधित आढळून आला त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे . विनाकारण बाहेर फिरू नका असे पोलिस वारंवार सांगत आहेत मात्र तरीही काही ठिकाणी लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळुन येत आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल करून कंटाळलेल्या पोलिसांनी अखेर कारवाईचा नवीन फंडा शोधून काढला. कोणाच्या दुचाकी जप्त केल्या तर काहीच्या दुचाकीतील हवा सोडली. त्यामुळे दुचाकीस्वरांना गॅरेजपर्यंत गाडी ढकलत न्यावी लागली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर