शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

corona cases in Satara : सातारा जिल्ह्यात २५ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:23 IST

corona cases in Satara : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी ८०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून, २५ बाधितांचा मृत्यू झाला. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यांतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र अजून देखील थांबलेले नाही.सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार ९४ इतकी झाली असून, बाधितांच्या मृत्यूचा आकडा ४ हजार ३४ झालेला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात २५ बाधितांचा मृत्यू ८०४ नवे बाधित; सातारा कऱ्हाड तालुक्यातील मृत्यूसत्र कायम

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी ८०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून, २५ बाधितांचा मृत्यू झाला. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यांतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र अजून देखील थांबलेले नाही.सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार ९४ इतकी झाली असून, बाधितांच्या मृत्यूचा आकडा ४ हजार ३४ झालेला आहे.

सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांतील बाधितांची संख्या पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी कऱ्हाड तालुक्यात २५९ तर सातारा तालुक्यात १३४ नवे बाधित आढळून आलेले आहेत. खटाव तालुक्यात देखील बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये बाधित आढळून येत आहेत.कऱ्हाड तालुक्‍यात आत्तापर्यंत ८३३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी नऊ जणांना जीव गमवावा लागला. सातारा तालुक्यातील रुग्णांची संख्या ४० हजार ८१४ इतकी झाली असून, शुक्रवारी आठ बाधितांच्या मृत्यू झाला. या तालुक्यात एकूण १ हजार २४७ बाधितांना जीव गमवावा लागला आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्यांचे मृत्यूदेखील थांबवणे प्रशासनाला शक्य झालेले नाही अन् दुसरीकडे जिल्ह्यातील निर्बंध उठवले असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावर देखील लोकांची मोठी गर्दी असते, यातून रुग्णसंख्या वाढण्याची भीती देखील मोठी आहे.जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ६२७ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ९६ हजार ७७३ इतक्या तपासण्या करण्यात आल्या त्यातून १ लाख ९५ हजार ९४ रुग्ण आढळले तर १ लाख ८२ हजार १५० रुग्ण कोरनामुक्त झाले. ९ हजार ८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.म्यूकरमायकोसिस बाधित एकाचा मृत्यूजिल्ह्यात म्यूकरमायकोसिस व्याधीग्रस्त १ रुग्ण नव्याने आढळला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्याधीने आतापर्यंत १६६ लोकांना बाधा झाली. ९३ जण या व्याधीतून बरे झाले. म्यूकरमायकोसिसमुळे आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर