शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत २४ तासांत ५ टीएमसी पाणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:50 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. कºहाड तालुक्यातील गोटेवाडीत भराव वाहिला. कास, बामणोली परिसरात दरड कोसळल्याने रस्ता व शेतीचे नुकसान झाले. साताऱ्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तर शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झोडपून काढले, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. कोयना धरणात गेल्या २४ तासांत जवळपास ५ टीएमसी पाणीसाठा वाढला, तर सततच्या या पावसामुळे कास, बामणोली, तापोळा, पाटण, ठोसेघर या भागात ओढे, नाले खळाळू लागले आहेत, त्यामुळे नुकसानीच्या घटनाही घडू लागल्यात. कास परिसरात एका रस्त्यावर डोंगरावरील दरड कोसळली. तर सततच्या पावसामुळे पश्चिम भागात शेतीचे नुकसान होत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामेही खोळंबली आहेत.सातारा शहर व परिसरात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीतपणा आला आहे. प्रामुख्यानेसदर बझार व गोडोली या भागालापावसाचा मोठा फटका बसला असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.पाटण तालुक्यातील विविध भागांत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाटण ते मोरगिरी जाणाºया रस्त्यावर कालव्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाटण-तारळे मार्गावरील गुजरवाडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद झालीय.गोटेवाडी (ता. कºहाड) येथील बंधाºयावर रस्त्यासाठी टाकलेला भराव रविवारी दुपारी पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे बंधाºयात साठलेले पाणी आसपासच्या शेतात घुसून नुकसान झाले. कास तलावाकडून पुढे कास गाव व बामणोलीकडे जाणाºया रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे पंचवीस फूट रुंद व सत्तर फूट खोल खोदकाम झाले होते. याच ठिकाणी रस्ता खचल्याने बामणोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर कोळघरजवळ दरड कोसळल्याने शेती व रस्त्याचे नुकसान झाले. कास पठार परिसरात सतत पाऊस कोसळत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.