शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात शिंदे घराण्याचे योगदान मोलाचे

By admin | Updated: January 13, 2016 00:22 IST

हुमगावात स्मृतिदिन सोहळा : कर्तृत्ववान व्यक्तींचा शिंदेशाही पगडी देऊन गौरव

सातारा : ‘छत्रपती शिवराय तसेच शंभूराजे ते दत्ताजीराव शिंदेपर्यंत असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडे रोवले. मात्र, खोटारड्या इतिहासकारांनी हा इतिहास समाजापासून नेहमी दूर ठेवले आहे,’ असे मत इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.ते हुमगाव येथे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे यांच्या २५५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, किसनशेठ शिंदे, पंचायत समिती सदस्य मोहनराव शिंदे, चंदन शिंदे, वैशाली शिंदे, भीमसिंह शिंदे, प्रमोद शिंदे, सुभाष शिंदे, सुदाम शिंदे मान्यवर उपस्थित होते.कोकाटे म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या राज्य व लोकसेवा आयोगाच्या परीक्ष्ोत पेशव्यांचाच इतिहास का विचारला जातो? मराठ्यांचा का विचारला जात नाही? इतिहासात मराठ्यांचा इतिहास अजरामर करणारे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे यांचा पराक्रम पेशव्यांपेक्षा किती तरी मोठा आहे. मराठ्यांनी इतिहास घडविला, तो कधीच लिहिला नाही आणि जो लिहिला तो दिशाभूल करणारा आहे.’ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘इतिहासात छत्रपती शिवरायांच्या घराण्याबरोबर निष्ठावंत व बरोबरीने सहकार्य करणारे शिंदे घराण्याने स्वराज्य निर्माण करण्यासाठी शौर्याने छत्रपतींना साथ दिली. छत्रपती शिवरायांनी शिंदे घराणे एकनिष्ठ होते.’ आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांच्या काळापासून शिंदे सरकार घराण्यांने स्वराज्यास साथ देऊन घराण्याचा नावलौकिक केला आहे.’प्रारंभी महामार्गावर शिंदे घराण्यातील युवकांनी मोठी रॅली काढली. या कार्यक्रमात शिंदे घराण्यातील विशेष कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)