अरुण पवार-- पाटण --रस्त्यांच्या कामाचा ठेका घेऊन त्यातून चार पैसे कमवावेत, या हेतूने काही बेरोजगार तरुण बांधकाम विभागाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून कामे मिळवतात. मात्र, काही महिन्यांपासून एका शाखा अभियंत्याने या सर्वांना चांगले जेरीला आणले असून, काही तरुणांना भाजीपाला आणून दे, तांदूळ आणून दे, एवढेच काय कामाचा ठेका दिल्याबद्दल टक्केवारी मिळविण्यासाठी ठेकेदाराला देवळात नेऊन त्याला शपथा घेण्याचे कारनामे सुरू आहेत.आमदार शंभूराज देसाई यांचा हा घरचा बालेकिल्ला. त्या अंतर्गत सुमारे ४० ते ५० घरांचा गावे येतात. यामध्ये हे दोन पंचायत समिती गण आहेत. मग या गावांमध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषद शेष फंड व इतर योजनेतून रस्त्यांची छोटी-मोठी कामे सुरू आहेत. मग अशा रस्त्यांचा ठेका मिळविणे ते कामांची एमबी उतरविणे किंवा काम केल्याबद्दलची बिले काढण्यापर्यंतची कामे बांधकाम विभागाच्या हातात असतात.मग अशी कामे करून देण्यापूर्वी संबंधित रावसाहेबांची टक्केवारी ठरली जाते. हा सर्व भाग नित्यनियमाचा झाला आहे.पण, त्याहीपुढे जाऊन जर रावसाहेबांच्या विविध आणि विचित्र मागण्या असतील, तर त्या कोणी पुरवायच्या या विचारात परिसरात ठेकेदार पडले आहेत. टक्केवारी देऊनसुद्धा आणि भाजीपाला, मासे, तांदूळ पुरवून देखील रावसाहेब बिले काढेनात. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरही ते क्वालिटी कंट्रोल करून तपासले पाहिजे. ‘साहेबांना घेऊन जातो, काम बघतो; मग या नाही तर अजून तांदूळ द्या,’ अशा सांकेतिक भाषामुळे त्या बांधकाम कर्मचाऱ्यापुढे ठेकेदार आता हातपाय टेकण्याची वेळ आली आहे. चार पैसे कमवायला संधी मिळावी म्हणून तरूणांनी घेतलेले ठेक्यांसाठी साहेबाची धुणी धुवायची वेळ आल्याने हे ठेकेदार पुरतेच वैतागले आहेत. +देवाची शपथ घे, कुणाला सांगणार नाही...संबंधित रावसाहेबांनी ठेकेदारांना सळो की पळो करून सोडले असून, एका ठेकेदाराला सातारा येथील क्षेत्र माहुली येथे नेऊन टक्केवारीच गाठोडे ताब्यात घेतले. ते घेताना तेथील मंदिरात शपथ घ्यायला लावली आणि कुणाला सांगणार नाहीस हे वदवून घेतले.आमदार आणि उपअभियंत्यांनाही जुमानत नाहीरावसाहेबांच्या या कहाण्या आमदार व उपअभियंत्याना ठेकेदारांनी समक्ष भेटून सांगितल्या आहेत. तरीसुद्धा काहीही सुधारणा रावसाहेबांच्यात झाली नाही. सर्व चोचले पुरवून सुद्धा रावसाहेबांनी अनेक ठेकेदारांची बिले अडकवून ठेवलेली आहेत.
टक्केवारीसाठी ठेकेदारांची देवळात शपथ!
By admin | Updated: October 8, 2015 22:25 IST