शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

‘कन्टेम्पररी’ नृत्याविष्कार ते ‘टॉलिवूड’

By admin | Updated: January 13, 2015 00:17 IST

लाइव्ह स्टेज शो : पंकज चव्हाण अ‍ॅकॅडमीच्या नृत्यप्रकारांनी सातारकरांना धरायला लावला ठेका

सातारा : ‘मोरया-मोरया’पासून ‘रेशमाच्या रेघांनी’पर्यंत आणि ‘कन्टेम्पररी’ आकृतिबंधांपासून थेट ‘टॉलिवूड’पर्यंत... एकसे एक धमाकेदार परफॉर्मन्स. उसळतं संगीत आणि त्यावर सातारकरांच्या पावलांनी धरलेला ठेका. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली नृत्यरजनी रंगतच गेली.. रात्री पावणेअकरापर्यंत! पंकज चव्हाण अ‍ॅकॅडमीच्या डान्स वर्कशॉपमध्ये सिद्धेश पैने मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘लाइव्ह स्टेज शो’ शाहू कलामंदिरात रंगला. क्षणाक्षणाला हसविणाऱ्या डी. महेश यांच्या निवेदनाने तो आणखी खुलला. प्रारंभी स्वप्नील आणि अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना गायिली. नंतर ‘मोरया मोरया’ हा नृत्याविष्कार झाला. नंतर ‘इंडियावाले’ गाण्यावर थिरकणाऱ्या बालचमूला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘रेशमाच्या रेघांनी’ लावणीने ‘वन्समोअर’ घेतला. ‘मला वेड लागले’ गाण्यावर कन्टेम्पररी नृत्याविष्कार सादर झाला. अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या ‘मम्मींच्या, ‘मनवा लागे’ आणि ‘तितली बन के दिल उडा’ या नृत्यांना प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात दाद दिली. मेहेरबाँ, जुम्मे की रात, धतिंग नाच यांसारख्या एकसे बढकर एक गाण्यांवर नृत्ये सादर झाली. ‘जय मल्हार’ मालिकेच्या शीर्षकगीतावरील नृत्याला विशेष प्रतिसाद लाभला. पंकज चव्हाण यांनी डोळे बांधून सादर केलेल्या कन्टेम्पररी नृत्याला प्रेक्षकांनी उभे राहून प्रतिसाद दिला. शेवटी ‘डीआयडी’फेम सिद्धेश पैने सादर केलेल्या नृत्यावर प्रेक्षक फिदा झाले. (प्रतिनिधी)मान्यवरांची उपस्थितीप्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नटराजाचे पूजन करण्यात आले. बँक आॅफ महाराष्ट्रचे केदार स्वामी, थोरात, हॉटेल राधिका पॅलेसचे दीपक पाटील, अ‍ॅम्बिशन क्लासच्या रूबी, दिलीप येळगावकर, विशाल ढाणे, सुमित साठे, सारंग गुजर, प्रदीप चव्हाण, नितीन दीक्षित, समृद्धी जाधव, राजू घुले, पोदारचे प्राचार्य साहू, निर्मला कॉन्व्हेन्टच्या मिला ग्रीन, अरुण गोडबोले, सिद्धेश पै, पंकज चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.