शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चा दिल्ली घटनेचे पडसाद : शेकडो नागरिक सहभागी; महिलांचा मोठा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:57 IST

जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देतहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यावर संविधान प्रतिज्ञेचे वाचन केले. तसेच लहान मुलींनी इंग्रजीमध्ये संविधान प्रतिज्ञेचे वाचन केले.

फलटण : जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

या मोर्चाला मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनपासून सुरुवात झाली. जुनी चावडी, पंचशील चौक, बारामती चौक, नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौकमार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला.

यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. अशा संविधानाच्या प्रती जाळून असे मनुवादी कृत्य करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. येणारा काळ हा खूप गंभीर आहे. या काळास सामोरे जाण्यासाठी समक्षपणे उभे राहण्याची गरज आहे.’

बसपाचे महाराष्ट्र सचिव काळुराम चौधरी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन संविधान तयार केले. हे संविधान जाळणाºया मनुवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही.’ त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने तहसीलदार विजय पाटील व फलटण शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. फलटण शहरात शांततेत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन