शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

काँग्रेस, रासप जोमात; राष्ट्रवादी मात्र कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:02 IST

माण-खटाव मतदारसंघ : दमदार नेतृत्वाची गरज--कारण राजकारण

नवनाथ जगदाळे-- दहिवडी --एकेकाळी माण तालुक्यातील सर्वच सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. आमदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यात लक्ष घातले तरीही अनेक सहकारी संस्था पंचायत समिती राष्ट्रवादीने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते; परंतु माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची अत्यंत वाताहात झाली तर उलट तालुक्यात काँग्रेस, रासप जोमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.माण तालुक्यात आजही काँग्रेसला टक्कर देणारी ताकद राष्ट्रवादीमध्ये असतानाही राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी फक्त पदापुरते उरले आहेत. गाव सोडून एकही नेता पक्षासाठी कार्य करावे, या मन:स्थितीत नाही. वर्षात आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. आरक्षण सोडत झाली की लगेच इच्छुक मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करतील. तत्पूर्वी पक्ष म्हणून सामुदायिक जबाबदारी राष्ट्रवादीमध्ये कोणीही स्वीकारत नाही. भाजपाने कार्यकर्ता नोंदणीमध्ये एक पाऊल पुढे ठेवले आहे. शिवसेनेनेही दहिवडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नितीन बानुगडे-पाटल यांनी त्यांना रणजित देशमुख यांच्यासह सर्वांनी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. त्यांना पालकमंत्री विजय शिवतारे यांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कोट्यवधींची कामे मंजूर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. तालुक्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ‘रासप’चे शेखर गोरे यांनी प्रत्येक निवडणुकीत आव्हान उभे केल्याने येथून पुढे दोन गोरे बंधूंचा संघर्ष तालुक्याला पाहावयास मिळत आहे. पदाधिकाऱ्यांच्या किरकसाल, भांडवली या ठिकाणच्या सोसायट्या सोडल्या तर सर्वच ठिकाणी दोन गोरे बंधूंमध्ये लढत झाली आहे. सर्वच पक्षांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या-त्या पक्षाला याचा फायदा होणार आहे. (क्रमश:)वरिष्ठांचे प्रयत्न अपुरेवरिष्ठांनीही जेवढे हवे तेवढे प्रयत्न न केल्याने आज राष्ट्रवादीची ताकद असूनही वाताहात झाल्याचे चित्र आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून, हे दोन्ही पक्ष जोमात असताना राष्ट्रवादी मात्र कोमात गेल्याचे चित्र आहे. पोळ तात्यानंतर एकाही नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी चिंतन बैठक घेतली नाही. पदाधिकारी मात्र पद भोगण्याइतपत राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीला कोणाच्या तरी दावणीला जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न वरिष्ठांनी लक्ष न घातल्यास घातक ठरू शकतो. एकेकाळी डझनभर भरणा असलेल्या राष्ट्रवादीला मरगळ आली कशी, याचे चिंतन होणे गरजेचे आहे.