शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

खंडाळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे साटेलोटे

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू; राष्ट्रवादीत वरिष्ठांचा निर्णय ठरणार अंतिम

दशरथ ननावरे- खंडाळा  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खंडाळा तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे साटेलोटे होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रवादीला सरसरळ बाय मिळणार अशीच चर्चा असली तरी राष्ट्रवादीअंतर्गत उमेदवारांना मोठी रस्सीखेच आहे. याशिवाय काँग्रेसने नमती भूमिका घेतल्यास अंतर्गत बंडाळीची मोठी शक्यता आहे.खंडाळ तालुक्यातील ५१ विकास सेवा सोसायट्यांमधून जिल्हा बँकेतील एक संचालक निवडला जाणार आहे. यासाठी सर्व सोसायट्यांच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही सोसाट्यांच्या नव्याने निवडी झाल्याने ठरावात सूचनेनुसार बदलही झाले आहेत. असे असले तरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. बँकेचे विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील हे यावेळी इच्छुक आहेत.गतवेळी जिल्हा बँकेसाठी मोठा संघर्ष झाला होता, मात्र खंडाळ््यात सहकारी साखर कारखान्याचा उमेदवार दिला जाणार नसल्याचा अलिखित करार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची रणांगणातून सपशेल माघार राहिली तर राष्ट्रवादीला बिनविरोध निवडून जाण्याची संधी आहे. मात्र कारखाना निवडणुकीत काँग्रेसचा एक गट नाराज आहे. त्यामुळे बँकेला अपक्ष उमेदवार देऊन चुरस निमाण होण्याचीही शक्यता आहे.राष्ट्रवादीअंतर्गत मोठी चुरस असली तरी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांचे पाच वर्षांतील कामगिरी चांगली राहिली आहे, तसेच बँकेचे उपाध्यक्ष असताना अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. शिवाय तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करून पक्ष बळकट केला आहे. त्यामुळे या पदावर दत्तानाना ढमाळ यांचा प्रभावीपणे दावा आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्याकडे क्षमता असतानाही पक्षाने आजवर तशी संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनाही यावेळी मोठ्या अपेक्षा आहेत. जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मोठी फिल्डिंग होती; मात्र वर्णी लागली नसल्याने बँकेच्या उमेदवारीसाठी त्यांची प्रबळ दावेदारी आहे. त्यामुळे योग्य उमेदवार देण्याची मोठी जबाबदारी पक्षावर येऊन ठेपली आहे. याशिवाय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्या सोसायटी मतदार संघावर मोठा पगडा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक समजली जाते.