शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

देवापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

कुकुडवाड : देवापूर (ता. माण) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२० - २१मध्ये आठ जागांसाठी ही निवडणूक लागली होती. ...

कुकुडवाड : देवापूर (ता. माण) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२० - २१मध्ये आठ जागांसाठी ही निवडणूक लागली होती. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी गटाचे विरोधी आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाचा ९-० ने पराभव करीत ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व निर्माण केले. एकूण नऊ जागांपैकी प्रभाग क्र. ३मधून नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये मंगल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.

देवापूर सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १मध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये शहाजी बाबर (३१८), सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये सुनीता कांबळे (३०३), सविता बाबर (२९६), प्रभाग क्र. २मध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये तात्यासाहेब औताडे (३४८), ना. मा. प्र. स्त्री प्रवर्गामध्ये अलका चव्हाण (३३७), सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये तानुबाई बाबर (३३२), प्रभाग क्र. ३मध्ये अनु. जाती प्रवर्गामध्ये निशिगंधा बनसोडे (३७८), अनु. जाती स्त्री प्रवर्गामध्ये मुक्ताबाई बनसोडे (३७५) मते मिळवून श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनेलने ९-० अशी एकतर्फी सत्ता मिळवली आणि सत्ता परिवर्तन घडवून आणले.

आमदार जयकुमार गोरे गटाच्या शंभू महादेव पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये हणमंत पवार (२२१), सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये उर्मिला पोळ (२४६), सारिका बाबर (२३२), प्रभाग क्र. २ मधील सर्वसाधारण प्रवर्गामध्ये किरण बाबर (२३६), ना. मा. प्र. स्त्री प्रवर्गामध्ये स्वाती जाधव (२५१), सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये अर्चना बाबर (२५५), प्रभाग क्र. ३ मध्ये अनु. जाती प्रवर्गामध्ये सुप्रिया बनसोडे (२१४), अनु. जाती स्त्री प्रवर्गामध्ये सीमा बनसोडे (२१७) अशी मते मिळवून पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीमध्ये श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनेलच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन एकहाती सत्ता मिळविली.

(कोट)

देवापूर गावात गेली पाच वर्षे सत्ता असून, गावात कोणतीही विकासकामे झाली नाहीत म्हणून सत्ता परिवर्तनाची गरज व गावचा विकास करण्यासाठी मतदारांनी दिलेला एकहाती कौल गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे.

- शहाजी बाबर, नूतन सदस्य

फोटो...

18देवापूर

देवापूर (ता. माण) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री शंभू महादेव पॅनेलच्या उमेदवारांनी यशानंतर हात वर करून जल्लोष साजरा केला. (छाया : सागर बाबर)