शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्ट्रवादीची जुगलबंदी

By admin | Updated: July 23, 2016 23:46 IST

नागरी समस्यांचे वेध : राजकीय फडात रंगत; तरुण कार्यकर्ते उत्साही--खंडाळा -नगरपंचायत -राजकारण

खंडाळा : नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी कंबर कसली आहे. विशेषत: तरुण कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत. लहान-मोठ्या नागरी समस्यांचा शोध घेऊन ते सोडविण्याची स्पर्धाच खंडाळ्यात लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तालुक्याचे ठिकाण असल्याने खंडाळ्याची नगरपंचायत जाहीर झाली. पहिल्या निवडणुकीसाठीचा बिगुल वाजल्याचे सर्वपक्षीय तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. नगरसेवक आरक्षणे आणि प्रभाग रचना निश्चित झाल्यामुळे आपल्या प्रभागांमध्ये इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. विशेषत: अनेक वर्षे सत्तारुढ असलेल्या कॉँग्रेसने आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी तरुणांची मोठी फळी तयारीच्या मैदनात उरली आहे, तर प्रत्येकवेळी संघर्षाचा पाढा वाचणाऱ्या राष्ट्रवादीने यावेळी पहिल्यापासूनच सतर्क राहून जोरदार तयारी करण्यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे.खंडाळा नगरपंचायतीच्या फडात निर्णायक कुस्ती करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला भलताच वेग आला आहे. नगरपंचायतीचे मैदान मारण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईसाठी समस्यांना शस्त्र बनवले गेले आहे. त्यामुळे नागरी समस्यांचा उठाव झाला असून, प्रशासनापर्यंत लोकांची भूमिका मांडण्याचे काम कार्यकर्त्यांनी हाती घेऊन पक्षीय ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष बावकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्य स्वप्नील खंडागळे, दीपक सूर्यवंशी, दत्तात्रय गाढवे, अनिल गाढवे, राजेंद्र चव्हाण, विशाल गोळे या कार्यकर्त्यांनी खंडाळ्यात घरगुती गॅस वितरणामध्ये लोकांना अडचणी येत आहेत. गॅस वितरकांकडून अतिरिक्त पैसे घेऊनही घरापर्यंत गॅस पोहोचविला जात नसल्याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयात दिले. तर राष्ट्रवादीचे औद्योगिक सेल अध्यक्ष शैलेश गाढवे, शहराध्यक्ष प्रशांत गाढवे यांच्या नेतृत्वाखाली दयानंद खंडागळे, केतन देशमुख, प्रवीण गाढवे, आशिष गाढवे या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तेथे मुरूम टाकून साईडपट्ट्या तातडीने भरून घेण्याबाबतचे निवेदन दिले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने नगरपंचायतीच्या मैदानावर आपले पिच भक्कम बनविण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. याची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबरच नगरपंचायतीच्या निमित्ताने शिवसेनेने पक्षीय बैठका घेऊन तयारीचे रणशिंग फुंकले आहे. सेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनीही संपर्क सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींनी वातावरण तापत आहे. (प्रतिनिधी)