शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘काँगे्रस’ सदस्यांची कोयनेत ‘आकाडी’!

By admin | Updated: July 31, 2016 00:04 IST

घड्याळाचे काटे फिरले उलटे : शिवाजीराव शिंदेंवरील अविश्वास ठराव राष्ट्रवादीच्या अंगलट

प्रमोद सुकरे / कऱ्हाड सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँगे्रसची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँगे्रसने कोयनेत नेऊन ठेवलेल्या सदस्यांपैकी एकही मासा गळाला न लागल्यामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी तोंडघशी पडली. अविश्वास ठरावाच्या आदल्यादिवशीच कोयनेत दाखल झालेल्या सदस्यांचा राष्ट्रवादीची जिरवण्याइतपत आकडा गाठला. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळीच एका रिसॉर्टवर काँगे्रसच्या या सदस्यांनी जणू ‘आकाडी’च साजरी केली. राष्ट्रवादी काँगे्रस अंतर्गत वादामुळे जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून घडतंय-बिघडतंय असे चित्र पाहायला मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणजे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांचा राजीनामानाट्य. शिंदेंनी थेट कोर्टात आव्हान देत, ‘तो मी नव्हेच प्रमाणेच्या भूमिकेत जाऊन हा माझा राजीनामाच नाही,’ असे सांगत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. त्यामुळे ज्यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता, ते राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अस्वस्थ झाले. त्यातूनच अविश्वास ठरावाचा दुसरा अध्याय सुरू झाला; पण शनिवारी हा प्रयोग पुरता फसल्याने राष्ट्रवादीत गलबला निर्माण झाला आहे. सुभाषराव नरळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसांतच नेत्यांच्या सूचनेनंतर हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्यासाठी शनिवार, दि. ३० रोजी विशेष सभाही बोलविण्यात आली. मात्र, ठराव मंजूर करण्यासाठी लागणारे संख्याबळ कमी पडत असल्याची जाणीव नेत्यांना झाली. आजवर काँगे्रसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेपासून जाणीवपूर्वक चार ‘हात’ लांब ठेवणारे नेतेच आता काँगे्रसच्या सदस्यांना मदतीचा ‘हात’ मागू लागले. तेव्हाच काँगे्रस सदस्यांनी राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे ओळखून आजवर फसविण्याऱ्या अन् झुलवत ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला हिसका दाखवायची हीच वेळ आहे, हे ओळखले. शुक्रवारी दुपारी विरोधीपक्ष नेते जयवंत जगताप अन् पक्षप्रतोद अविनाश फाळके यांनी कऱ्हाडात पत्रकार परिषद घेऊन काँगे्रस सदस्यांसाठी विशेष सभेला गैरहजर राहण्याचा व्हीप काढला असल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी काय घडणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. एकाबाजूला विश्रामगृहात ही पत्रकार परिषद सुरू असतानाच कऱ्हाडातील एका हॉटेलमध्ये काँगे्रसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा ‘संगम’ व्हायला सुरुवात झाली. सायंकाळी अपेक्षित सर्व सदस्य आल्यानंतर गाड्यांचा ताफा कोयनानगरला रवाना झाला.तेथे एका रिसॉर्टमध्ये या साऱ्यांची खास बडदास्त ठेवण्यात आली होती. रात्री खासदार उदयनराजे भोसले समर्थक असणारे जिल्हा परिषद सदस्यही कोयनेत दाखल झाले अन् आकड्यांची गोळाबेरीज झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आता उलटे फिरणार याची खात्री पटली. मग उपस्थित सर्वांनी आनंदाप्रीत्यर्थ आकाडी साजरी केली. तरीपण शनिवार सकाळपासून कोयनेत मुक्कामी असणाऱ्या या साऱ्या सदस्यांचे लक्ष साताऱ्याच्या घडामोडींकडे होतेच. तेथे राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ जमवता आले नसल्याची वार्ता भ्रमणध्वनीवरून मिनिटा-मिनिटाला मिळत होतीच; पण दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकृतपणे हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित केले. त्यामुळे काँगे्रस अन् राष्ट्रवादी समर्थक सदस्यांच्यात आनंदी व समाधानाचे वातावरण पसरले. मोहीम फत्ते झाल्याची खात्री होताच. आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील या दोघांनी कोयनानगर गाठले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांचा विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर कोयनेत आलेल्या सर्व सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेत घराकडे वाटचाल केली.