शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मानवता धर्मामुळेच समाजात एकोपा:पुनियानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:39 IST

सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला ...

सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला जातो. अशावेळी संत, महामानवांचा मानवता धर्मच सर्वांत एकोपा ठेवत आहे. त्यामुळे आपणा सर्वांना मानवता धर्मानेच पुढे जायचे आहे, हे लक्षात ठेवावे,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी केले.येथील गांधी मैदानावर मुस्लीम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सर्वधर्म भाईचारा सभा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पुनियानी बोलत होते. या कार्यक्रमाला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सुहास फडतरे, साताऱ्यातील शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलील अहमद, टिळक मेमोरियल चर्चचे डॉ. डॅनियल गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे विद्याधर गायकवाड, लिंगायत समितीचे सागर कस्तुरे, महानुभव पंथाचे राजकुमार बीडकर आदी उपस्थित होते.डॉ. पुनियानी म्हणाले, ‘जगात इस्लाम धर्माला दहशतवादाशी जोडले जात आहे, हे चुकीचे आहे. संतांनी धर्माला प्रेमात पाहिले. धर्म हा जगाला प्रेम शिकवतो, द्वेष नाही. सर्वांनी प्रेमाने राहावे, हे मानवता धर्मच शिकवतो.’डॉ. फडतरे म्हणाले, ‘मुहम्मद पैगंबर यांनी आपण सर्वजण एकच आहोत, हे जगाला प्रथम सांगितले. मानवता धर्माची प्रेरणा मुहम्मद पैगंबर यांनीच सर्वांना दिली आहे. माणूस बनण्यासाठी संत आणि महामानवांची विचारधारा अंगीकार करणे आवश्यक आहे.’हाफिज खलील अहमद यांनी एका मानसाने दुसºयाचा आदर करावा. कोणताही धर्म खोटे बोला, चोरी करा, द्वेष करा, असे सांगत नाही तर प्रेम करा, असेच सांगतो, असे सांगितले.या कार्यक्रमाचे विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. रफिक शेख यांनी आभार मानले.