कऱ्हाड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांनी कऱ्हाड तहसील कार्यालयावर तीन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. तो मोर्चा अहिंसा मार्गाने शांततेत पार पाडून तहसील कार्यालयावर तिरंगा फडकवला होता. त्यावेळी दादा उंडाळकर यांना अटक झाली होती. त्या मोर्चाचा मंगळवारी ८० वा स्मृतिदिन उत्साहात पार पडला. तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभाला मान्यवरांनी अभिवादन केले.
शासकीय पातळीवर तहसील कार्यालयासमोरील विजय स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे, स्वातंत्र्यसैनिक आनंदराव जाधव, हिंदुराव जाधव, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात उपस्थित होते. उंडाळे ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. आनंदराव पाटील यांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले. यावेळी मोहनराव शिंदे, समिर मुल्ला, विवेक जाधव, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
चौकट
उंडाळेत क्रांतिज्योत पेटविली
दादा उंडाळकर यांनी काढलेल्या या मोर्चाची सुरुवात उंडाळे येथे मशाल पेटवून करण्यात आली होती. त्याचे स्मरण म्हणून उंडाळे येथील विद्यालयाच्या आवारात ॲड. आनंदराव पाटील यांच्याहस्ते क्रांतिज्योत मशाल पेटवण्यात आली. यावेळी सरपंच संगीता माळी, माजी सरपंच दादा पाटील, गणेश पाटील, प्राचार्य बी. आर. पाटील यांची उपस्थिती होती.
फोटो
कऱ्हाड येथील तहसील कार्यालयातील स्मृतिस्तंभास मंगळवारी ॲड. आनंदराव पाटील, मोहनराव शिंदे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी अभिवादन केले.