शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Mahabaleshwar Hill Station Satara- महाबळेश्वरला सहलीसाठी येणे मुंबईकरांना महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 11:32 IST

Mahabaleshwar Hill Station Satara : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला.

ठळक मुद्देजिल्हाबंदी आदेश भंग : पर्यटकांकडून ५५ हजारांचा दंड वसूल महाबळेश्वरला सहलीसाठी येणे मुंबईकरांना महागात पडले

महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्हयाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठीच जिल्ह्याची सीमा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे.मुंबईच्या पर्यटकांनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेल लि मेरिडीयनमधील रूम ऑनलाईन बुक केल्या. ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्हयाच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. हे पर्यटक शुक्रवारी सायंकाळी येथील नाक्यावर आले असता त्यांनी हॉटेल बुकिंग असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला.ही माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी पर्यटकांच्या शोधासाठी तातडीने पथक रवाना केले. या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडली. तर इतर दोन गाडया हॉटेलच्या प्रवेशव्दारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकारी यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना सर्व हकिकत सांगितली.

मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार तर या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्द्ल हॉटेल व्यवस्थापनास २५ हजार रूपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने ५५ हजाराचा दंड वसूल केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर