शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

खासदारकीचा राजीनामा देऊन आमने-सामने या!

By admin | Updated: April 3, 2015 00:45 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : श्रीराम साखर कारखान्याच्या प्रचारसभेत उदयनराजेंना खुले आव्हान

वाठार निंबाळकर : ‘हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा अपक्ष निवडणूक लढवावी. आपणही लढण्यासाठी तयार आहोत,’ असे खुले आव्हान देत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ निरगुडी, उपळवे, ढवळ तसेच हिंगणगाव येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादाराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, रामभाऊ ढेकळे, एल. आर. जाधव, सुरेश सोमण, शिवाजीराव सस्ते, राजेंद्र सस्ते, बापूराव लोखंडे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘मी ही फूटपायरीचा सम्राट आहे. त्यांनी माझ्या नादाला लागू नये. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एक कारखाना एक रस्ता, एक शाळा, एक इमारत, एक गटार यापैकी काय बांधलेय. जमीन विकताना सर्वकाही साखर आयुक्त, संचालक यांच्या सूचना व आदेशांचेच व्यवहार केला आहे.’खंडाळा, फलटणच्या औद्योगिक वसाहतीत मी कंपन्या आणल्या; मात्र हे आता प्रत्येक ठिकाणी संघटना करून माथाडी घ्या, यासाठी वाद करत आहेत. राज्यात जलसंपदा विभागाच्या तीन वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. यापैकी कुठेही आपण अध्यक्ष असलेल्या कृष्णा खोरे महामंडळाचा समावेश नाही,’ असेही रामराजे म्हणाले.रामराजे पुढे म्हणाले, ‘जावळीत सातबाऱ्यावर खोटी नावे चढवून जमिनी विकायचा सपाटा लावला आहे. त्यांना जर फलटण व श्रीराम कारखान्याचा एवढाच पुळका आहे, तर का देत नाही पन्नास कोटी? आपण सभापतिपदावर असताना खासदारकीची निवडणूक लढवू शकतो. उदयनराजेंनी राजीनामा देऊन अपक्ष म्हणून लढवावी. यांच्या दहशतीला जिल्हा कंटाळला असून, असे छत्रपती या जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रातही जन्माला येऊ नयेत. सध्या हे शिवसेनेने पालकमंत्री यांच्या गाडीत गळ्यात गळा घालून फिरत असतात.’ (प्रतिनिधी)‘श्रीराम’च्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पुढाकार : उदयनराजेसातारा : ‘श्रीराम साखर कारखान्यावर राज्य बँकेचे फक्त २६ कोटींचे कर्ज होते. हे कर्ज भागविण्यासाठी कारखान्याकडे जवाहर कारखान्याकडून मिळालेले १८ कोटी व दोन वेळा कारखान्याची जमीन विकून मिळालेले बारा कोटी रुपये असे तीस कोटी होते. मात्र, राज्य बँकेचा बागुलबुवा करून २६ कोटींचे कर्ज भागविण्यासाठी साडेएकवीस एकर जमीनविक्रीचे कटकारस्थान रचले आहेत,’ असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केला आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य बँकेचे कर्ज भागविण्यासाठी कारखान्याकडे पुरेशी रक्कम होती. तरीही कवडीमोल दराने जमीनविक्री करणे संशयास्पद आहे. कारखान्याकडे त्यावेळी असलेले तीस कोटी गेले कोठे, याची चौकशी व्हायला हवी. सभासदांच्या हितासाठी आम्ही न्यायालयीन आणि सहकार खात्यामार्फत चौकशी सुरू करण्यासाठी कार्यवाही करणार आहोत.कारखाना पोटनियमात जमीनविक्रीची तरतूद नाही. सातारा येथील न्यायालयाचा जप्ती आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान केला आहे. जमीनविक्रीच्या नियमांना तिलांजली देऊन, सभासदांची दिशाभूल करून २१ एकर २० गुंठे जमीनविक्रीचा लिलावप्रक्रिया दहशतीखाली पूर्ण केली. एका व्यक्तीने लिलावप्रक्रियेत भाग घेऊन जमीन साठ कोटींना घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यांना दमबाजी करून हुसकावून लावण्यात आले. जमीनविक्रीत सभासदांना प्रथम अधिकार असतो. तथापि सभासदांना कोणत्याही प्रकारे विचारलेही नाही. उलट कारखान्याचे सभासद जादा किमतीला जमीन घेण्यात तयार होते. मात्र त्यांना वंचित ठेवले. ही मोठी शोकांतिका आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.इतक्या बेडरपणे सभासदांचा आणि कारखान्याचा गळा घोटून केलेली जमीनविक्री व जमीन घेतलेले समाजात खुलेआम फिरत आहेत. म्हणूनच या व्यवहाराची पोलखोल करणे आवश्यक आहे. अशांची चौकशी करण्यासाठी अटक करावी,’ असेही उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) रामराजे-रघुनाथराजे उवाच...छत्रपतींचे नाव सांगणाऱ्यांच्या शरीरात जर सईबाई, शिवरायांचे रक्त असेल, तर कदाचित ते इतक्या खाली जाऊन बोलले नसते. जे काल त्यांच्याबरोबर बगलेत बसले होते. त्यापैकी चारजणांचे फोन आपल्याला रात्रीच जिल्हा बँकेच्या तिकिटासाठी आले होते.यापुढे आमचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजेच. उदयनराजे नाहीत. मटकावाले, दारूवाले व टेंडरवाले हेच त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे सध्या महाबळेश्वरला विनापरवाना थ्रीस्टार हॉटेल सुरू आहे. विनापरवाना केवळ दहशतीवर त्यांना बाटली, ग्लासशिवाय काहीही दिसत नाही