शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनाची रंगत... सोडली तंबाखूची संगत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:57 IST

तीनशे तरुणांनी फेकल्या पुड्या : आश्रमातल्या भिंतींवरही व्यसनमुक्तीचे फोटो; सुभाष घाडगे यांचे कार्यलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कीर्तन, प्रवचन करणाºया महाराजांवर लोकांची श्रद्धा असते. श्रद्धेचा सकारात्मक वापर केल्यावर काय होऊ शकतं? याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात अनुभवास मिळत आहे. माण तालुक्यातील जाधववाडीतील सुभाषमहाराज घाडगे गेली ३२ वर्षे व्यसनमुक्तीवर कीर्तन करतात. त्यामुळे तब्बल ...

तीनशे तरुणांनी फेकल्या पुड्या : आश्रमातल्या भिंतींवरही व्यसनमुक्तीचे फोटो; सुभाष घाडगे यांचे कार्यलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कीर्तन, प्रवचन करणाºया महाराजांवर लोकांची श्रद्धा असते. श्रद्धेचा सकारात्मक वापर केल्यावर काय होऊ शकतं? याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात अनुभवास मिळत आहे. माण तालुक्यातील जाधववाडीतील सुभाषमहाराज घाडगे गेली ३२ वर्षे व्यसनमुक्तीवर कीर्तन करतात. त्यामुळे तब्बल तीनशेहून अधिकजणांनी तंबाखू, मिश्रीची यज्ञात आहुती दिली आहे.जाधववाडी येथील घाडगे यांची चौथी पिढी कीर्तनसेवा करत आहे. त्यांचा जाधववाडीत सेवासूर्य आश्रम आहे. सुभाष घाडगे हे वयाच्या २२ व्या वर्षापासून कीर्तन करतात. सुरुवातीला ते अध्यात्मावर कीर्तन देत. शंकरमहाराज रसाळ व किसनमहाराज घाडगे यांचे शिष्य असलेल्या घाडगेमहाराजांनी अध्यात्माला व्यसनमुक्तीची जोड दिली. कीर्तनाच्या वेळी संत तुकाराम महराजांच्या अभंगांचे दाखले देत व्यसनामुळे होणारा आर्थिक खर्च अन् आयुष्याचं गणितच मांडतात. एखाद्या तरुणाला उभं केलं जातं. त्याला वय विचारून दिवसाला किती पुड्या तंबाखू खातोस? हे विचारलं जातं. दिवसाला किती रुपयांची तंबाखू व चुना खातो, यावरून महिना, वर्ष अन् आयुष्याचं गणित मांडलं जातं. आयुष्यात लाखो रुपयांची तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकता, त्याचा तुम्हाला अन् समाजाला काहीच उपयोग नाही, हे पटवून सांगितलं जातं. त्यानंतर अध्यात्माचा आधार घेऊन तुळशीच्या माळेचे पावित्र्य सांगितले जाते. कीर्तन संपल्यानंतर उपरण्यात यज्ञ म्हणून खोकं घेऊन महाराज भक्तांमधून फिरतात. खरंच तंबाखू सोडणार असाल तर तुळशीच्या माळेला स्पर्श करून तंबाखूची पुडी यज्ञात टाकण्यास सांगितली जाते अन् लोकही प्रामाणिकपणे तंबाखूची पुडी काढून यज्ञात टाकतात. यामध्ये महिलाही मिश्रीची आहुती देतात.एवढ्यावरच सुभाषमहाराज घाडगे यांचे कार्य थांबत नाही. कीर्तन झाल्यावर संबंधित तरुणांच्या आई-वडिलांना बोलावलं जातं. त्यांच्याशी संवाद साधून ‘तुमचा मुलगा आजवर तंबाखू खात होता; पण त्याने प्रामाणिकपणे कबूल केल्याने तुम्हीही माफ करा अन् तुम्ही तंबाखू खात असल्यास सोडून द्या. तंबाखू, मिश्रीमध्ये विष असतं, ते घातक असल्याने खाऊ नका, असे आवाहन केलं जातं. त्यामुळे अनेक पालकही व्यसनमुक्त झाले आहेत.चित्रफीत अन् व्हॉट्सअ‍ॅप...सुभाषमहाराज आधुनिकतेचा वापर करतात. व्हिडीओ चित्रफीत दाखविली जाते. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे स्वत: अनुभव सांगतात. तसेच व्यसनमुक्त झालेल्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप केला आहे. त्यावरून प्रबोधन करतात.आश्रमात आंतरबाह्य बदल...सुभाषमहाराज घाडगे यांनी जाधववाडी येथील आश्रमातही मोठा बदल घडविला आहे. आश्रमात देवदेवतांचे फोटो होते. त्याजागी व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक, कर्करोग झालेल्या व्यक्तीचे फोटो त्याशेजारी रिकामा फोटो लावलेला असतो. त्यामुळे या आश्रमात आल्यानंतर माणूस बदलूनच जातो.