शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर परिसरातून जागतिक पर्यटनस्थळी पंधरा टन कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:28 IST

महाबळेश्वर : शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून, येथे नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम

ठळक मुद्देप्लास्टिक बाटल्यांचा समावेशमहाबळेश्वर नगर पालिकेच्या स्वच्छता मोहिमेस वेग

महाबळेश्वर : शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून, येथे नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनाहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.

‘महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी तयार केलेल्या कृती आराखड्यासाठी स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिक, व्यापारी तसेच शहरवासीयांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी केले.

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज हजारो पर्यटक भेट देतात. याच महाबळेश्वरला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख पर्यटक भेटी देतात. काही पर्यटक स्वत:च्या वाहनाने येतात तर काही पर्यटक एसटीने बसस्थानकामध्ये उतरतात. परंतु बसस्थानक परिसरच स्वच्छ नसतो.

या परिसरातील पाहणी पालिकेने केल्यानंतर या परिसरातील अंतर्गत भागांत बसस्थानक कर्मचाºयांनी दहा ते पंधरा वर्षे स्वच्छता मोहीम राबविण्यातच आली नाही, असे दिसून आले. महाबळेश्वर पालिकेकडून सलग तीन दिवस बसस्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. बसस्थानक परिसर हा शहराच्या मुख्य भागामध्ये येत असून, हा अंदाजे दोन ते तीन एकरामध्ये पसरलेला आहे. पुढे बसस्थानक तर मागील बाजूस एसटी आगार आहे. बसस्थानकात अंतर्गत भागांत वाढलेली झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्यांचा खच साठलेला होता.

पालिकेने तीन दिवस सफाई कामगार लावून या परिसरातून गेली दहा ते पंधरा वर्षांचा कचरा, प्लास्टिक पिशव्या दोनशेहून अधिक व एसटी धुतल्या जातात. या ठिकाण्यामधील प्लास्टिक कचरा डंपर लावून जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. यामुळे बसस्थानक परिसर सुंदर व स्वच्छ दिसू लागला. स्थानिक नागरिकांमधून नगरपालिकेचे कौतुक होऊ लागले आहे.पंधरा वर्षांत प्रथमच स्वच्छतामहाबळेश्वर बसस्थानक परिसरात झाडलोट करणारे एसटी महामंडळाने कर्मचाºयांची संख्या वाढवली आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानामुळे पंधरा वर्षांपासूनचा १५ टन कचरा गोळा करण्यात आला. पालिकेच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरात जवळपास दहा वर्षांनंतरच रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे. स्वच्छता मोहिमेमुळेच बसस्थानक परिसर आगार झाल्यापासून पहिल्यांदाच स्वच्छ करण्यात आला. यामुळे शहरातून व पर्यटकांमधून कौतुक होऊ लागले आहे.