शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातून थंडी गायब; उकाडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

आगाशिवनगरला अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर ...

आगाशिवनगरला अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य

मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर ही चर बुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांसह वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

मसूर ते निगडीपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय

मसूर : मसूर ते निगडी या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मसूर ते निगडी हा जवळचा रस्ता म्हणून ग्रामस्थ त्याचा वापर करतात. मात्र, गत दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फुटलेल्या झाकणातून केमिकलची दुर्गंधी

मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटारला साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणेही टाकण्यात आली होती. मात्र, दर्जाहीन झाकणांमुळे येथील मोरया कॉम्प्लेक्स ते ढेबेवाडी फाटा परिसरात तीन ठिकाणी झाकण फुटून वर्ष उलटून गेले आहे. या ठिकाणचे झाकण फुटल्यामुळे नाल्यात दगड व मातीचा खच पडला आहे. त्यामुळेच या ठिकाणी नाला तुंबला आहे. शिवाय या उघड्या गटारमध्ये केमिकल मिश्रीत पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन परिसरातील सर्वच चेंबरची झाकणे बदलावीत. गटार बंदिस्त करावी, अशी मागणी होत आहे.

पाटण ते चाफोली रस्त्याची दुरवस्था

पाटण : पाटण ते चाफोली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाटणच्या पश्चिम बाजूकडे चिपळूण महामार्गापासून चाफोली रस्त्याला सुरुवात होते; मात्र महामार्गापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंत या रस्त्याला पावसाळ्यात अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप येते. दोन-दोन फुटाचे खोल आणि आकार वाढत चाललेले खड्डे वाहनधारक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत.

अनेक वर्षांपासून नाल्यांची सफाईच नाही

मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नाले निर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दगड, माती व कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुडूपे वाढली आहेत. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे.