शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटाखाली प्रचाराचा नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST

इस्लामपूर आणि शिराळा तालुक्यांमधील सर्वच निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील काळमवाडी येथील काळमादेवीच्या दारात फुटतो. कृष्णा कारखान्याच्या तिन्ही पॅनलकडूनही ...

इस्लामपूर आणि शिराळा तालुक्यांमधील सर्वच निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील काळमवाडी येथील काळमादेवीच्या दारात फुटतो. कृष्णा कारखान्याच्या तिन्ही पॅनलकडूनही देवीचे दर्शन घेऊनच प्रचाराला सुरुवात होते. यंदाच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्याने इच्छुक उमेदवार मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत देवीचे दर्शन घेताना दिसत आहेत.

कऱ्हाड-वाळवा तालुक्यातील कृष्णा काठावरील जमीन ओलिताखाली आली आणि परिसरात उसाचे फड दिसू लागले. त्यावर प्रक्रिया करणारा सहकारी तत्त्वावर उभारलेला कृष्णा कारखाना ऊस उत्पादकांसाठी वरदान ठरला. सुखसमृद्धी आली. प्रत्येक साखर कारखान्याने आपापल्या परिसरात मंदिरांची उभारणी केली आहे. सत्तेवरील अध्यक्ष त्या-त्या मंदिरांत जाऊन दर्शन घेऊनच दररोजच्या कार्यालयीन कामकाजाला सुरुवात करतात. काळमवाडीतील काळमादेवी वाळवा-शिराळा तालुक्यातील राजकीय नेत्यांचे श्रद्धास्थान बनले आहे.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा नारळ काळमवाडी येथेच फोडला जातो. शिराळा मतदार संघातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजीत देशमुख, सम्राट महाडिक आदी नेते प्रचाराचा नारळ येथेच फोडतात. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेही ते श्रद्धास्थान आहे. कृष्णेच्या निवडणुकीतील पॅनलप्रमुखही वाळवा तालुक्यात प्रचारासाठी येतात, तेव्हा येथूनच प्रचाराला सुरुवात करतात.

कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांनी रुग्णसेवा, स्वत:च्या संस्था आणि साखर कारखाना यांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. माजी अध्यक्ष डॉ.इंद्रजीत मोहिते काही कार्यकर्त्यांचे अनुकरण करतात. मात्र, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या कार्याचे स्मरण करून दिल्याशिवाय सभासदाला पुढे जाऊ देत नाहीत. असे असले, तरी सर्वच पॅनलप्रमुख कार्यकर्त्यांच्या श्रद्धा जपतात आणि प्रचाराचा नारळ काळमवाडीत फोडतात. तेथूनच प्रचाराचा धडाका सुरू होतो. यंदा मात्र, निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्याने, इच्छुक उमेदवार मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत देवीचे दर्शन घेताना दिसत आहेत.

संस्थापक पॅनलचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते रेठरे बद्रुक येथून बाहेर पडताना आपल्या ग्रामदेवताचे दर्शन घेतात. त्यानंतर, आपल्या दिनचर्येला सुरुवात करतात. प्रत्येक शनिवारी पुनदी तालुका पलूस येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा उपक्रम असतो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळमा देवीला नारळ फोडून प्रचारला सुरुवातही केली.

- अशोक पाटील, इस्लामपूर

——————————————-