शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बंद उद्योगांनी अडविली जागा

By admin | Updated: June 25, 2015 21:28 IST

३५ पैकी १७ फ्लॅट रिकामे : पाटण औद्योगिक वसाहतीचे वाजले बारा

अरुण पवार - पाटण  तालुक्यातील भूमिपुत्रांसाठी औद्योगिक वसाहत उभारली. महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीस १५ वर्षे होऊनही मोजकेच उद्योग सुरू झाले अहोत. येथील ३५ पैकी तब्बल १७ फ्लॅट रिकामे आहेत. अनेक जागा बंद उद्योगाने अडविल्याने पाटण औद्योगिक वसाहतीचे बारा वाजले आहेत.पाटण तालुका हा दुर्गम भाग असल्याने तेथील पिढ्यान्पिढ्या गरिबीचे जीवन जगत आहेत. त्यांचा विकास व्हावा, सुशिक्षित तरुणांना त्यांच्या गावीच रोजगार मिळावा, यासाठी १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत उभारली. या ठिकाणी १५ वर्षांत मोजणेच उद्योग सुरू झाले आहेत. पुणे-मुंबईतील उद्योजकांनी पाटण एमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे लिजवर देण्यात येणाऱ्या ३५ पैकी निम्मे १७ फ्लॅट टाळे असल्यामुळे फक्त जागा अडविण्याचे काम केले आहे. पाटण तालुक्याचा शेजार असलेल्या चिपळूण आणि कऱ्हाड हे तालुके औद्योगिकीकरणामुळे आर्थिकदृष्ट्या सबळ झाले आहेत. तेथील तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमानही उंचावले आहे. शासनाच्या या अंगीकृत प्रकल्पाला उभारी देण्याचे काम पाटण तालुक्यात झाले नाही. तामकडे एमआयडीसीतील ३५पैकी जवळपास ७५ टक्के फ्लॅट निरुपयोगी ठरले आहेत. या प्रकल्पात वीज, पाणी, जागा मुबलक असताना बाहेरील उद्योजक का आले नाहीत? हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. आयटीआय प्रशिक्षण संस्था आणि एक-दोन प्रकल्प वगळता इतर फ्लॅट रिकामे तर काही फ्लॅटमधील उद्योगांना टाळे आहेत. त्यामुळे प्रशासनानेच लक्ष घालून खरे इच्छुक उद्योजक शोधून येथे आणणे गरजेचे आहे. उद्योग वळाले इचलकरंजीलातामकडे, ता. पाटण येथील औद्योगिक वसाहतीकडे उद्योग आले पाहिजेत, यासाठी जुलै महिन्यातच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. तत्पूर्वी एमआयडीसी व्यवस्थापकांकडून तामकडे एमआयडीसीची माहिती घेत आहे. तालुक्यातील अनेक उद्योजकांनी इंचलकरंजी येथे सूतगिरणीसारखे कारखाने सुरू केले आहेत. त्यांना तालुक्यात संधी उपलब्ध झाली तर तालुक्यातील तरुण नोकरीला लागतील. याबाबत मी स्वत: पाठपुरावा करणार आहे,’ अशी ग्वाही आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.कामगारांची होतेय पिळवणूककामगार अधिनियम व कायद्यानुसार या एमआयडीतील कामगारांना वेतन मिळाले पाहिजे. इतर सोयी सवलती, भविष्यनिर्वाह निधी, आरोग्य सेवा शासनाच्या नियमानुसार मिळत नाहीत. कामगारांची पिळवणूक होत असल्याची खंत कामगार बोलून दाखवत आहेत.