शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

हृदय बंद पडण्याअगोदर डॉल्बी बंद करा!

By admin | Updated: August 18, 2015 00:46 IST

ज्येष्ठांचा आवाज : कातरखटाव ग्रामसभेत सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी

कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथे विविध जयंत्या, लग्न समारंभ, गावदेव, मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे आमच्या हृदयाचे ठोके बंद पडण्याची वेळ आली आहे. काळजाचे ठोके बंद पडण्याअगोदर गावात डॉल्बी बंदीचा प्रस्ताव काढा, असा आवाज कातरखटावच्या ग्रामसभेत ज्येष्ठांनी उठविला व ग्रामसेवकांना धारेवर धरले. ज्येष्ठांनी घेतलेल्या डॉल्बीविरोधी भूमिकेला गावातील सर्व ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला. ग्रामसभेला महावितरणचे अधिकारी, लाईनमन, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, जनावरांचे डॉक्टर, शासकीय अधिकारी हजर नाहीत, त्यांना त्वरित बोलवावे. त्यानंतरच कोरमवर सह्या केल्या जातील व ग्रामसभा सुरू होईल, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तसेच मतदार ज्या-त्या वार्डामध्येच पाहिजे. या वार्डातील चार मतदार त्या वार्डात हा प्रकार आहे तो बंद झाला पाहिजे, तलाठी कार्यालयातील शासकीय कागदपत्रे व पुस्तके कोणत्याही खासगी माणसाच्या हातात गेली नाही पाहिजेत, नाहीतर अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत गावातील गटारे तुंबली असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले. ज्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत गेली वीस वर्षे दिलेल्या जागेपेक्षा वाढीव जागेचा वापर करीत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई का करीत नाही, असा मुदा विरोधकांनी सरपंच व ग्रामसेवकांपुढे ठेवला. या वादात विद्यमान सदस्यासह एकमेकाची उणीधुणीही काढली गेली. काही नागरिकांनी सत्ताधारी तर काहींनी विरोधकांची तळी उचलून धरीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याने ग्रामसभेला कुस्तीच्या आखाड्याचे स्वरूप आले होते. मात्र या ग्रामसभेची चर्चा दिवसभर ग्रामस्थांमध्ये चालू होती. (वार्ताहर)