शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख विद्यार्थ्यांचे स्वच्छता मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:47 IST

सातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी, स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्दे२ हजार ७७३ प्राथमिक व ७४४ हायस्कूल-महाविद्यालयांमध्ये उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी, स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावूनमतदान केले.

शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत मतदान घेण्यात आले. ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील २ हजार ७७३ प्राथमिक शाळांमधील १ लाख ४७ हजार ७५७ व ७४४ महाविद्यालयांमध्ये २ लाख ४७ हजार ८३८ विद्यार्थी असून, एकूण ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देऊन मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मतपत्रिका, मतपेटी बॉक्स, काळ्या शाईचा परमनंट मार्कर, विद्यार्थी मतदार यादी आदी शिक्षक उपलब्ध केले. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांचे मतदान झाल्यानंतर मतदान पूर्ण झाल्याची घोषणा करण्यातआली. या अनोख्या उपक्रमामुळे स्वच्छतेविषयी नेमकी जागृती करणे सोपे झाले.

मतदानानंतर शिक्षकांनी मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केल्याची निशाणी लावलेल्या बोटांसह फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपगु्रपवर टाकले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या निवडणुकीविषयी एक नवी जागृती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.हा झाला फायदाविद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती झाली. अनेकदा पालक घरात सांगत असतात, पण मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मतदानाच्या निमित्ताने मुलांना हो किंवा नाही, अशी उत्तरे द्यावी लागली असल्याने त्यांच्या मनाची तयारी झाली.या प्रश्नांची उत्तरे मिळालीघरामध्ये वैयक्तिक शौचालय आहे का?जेवणापूर्वी हात धुता का?शौचास जाऊन आल्यावर हात धुता का?पिण्याचे पाणी कसे घेता?